Join us

'निकल जाओ!' करण जोहरच्या 'अग्निपथ'मधून हाकलण्यात आलं; 'स्त्री २' फेम अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 15:43 IST

हृतिक रोशन-संजय दत्त यांच्या अग्निपथ सिनेमासाठी स्त्री २ मधील अभिनेता काम करत होता. परंतु पुढे मात्र या अभिनेत्याला काढण्यात आलं (stree 2)

सध्या 'स्त्री २' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमाचा विषय आणि वेगळं कथानक या गोष्टींमुळे 'स्त्री २' प्रेक्षकांचा आवडीचा सिनेमा बनला आहे. 'स्त्री २'मध्ये एकापेक्षा एक कलाकार पाहायला मिळत आहेत. राजकुमार राव, श्रद्धा कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहेच. शिवाय अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी या कलाकारांनी 'स्त्री २'ला चार चॉंद लावले आहेत. आज 'स्त्री २' गाजवणाऱ्या कलाकाराला एकेकाळी करण जोहरच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. हा कलाकार म्हणजे अभिषेक बॅनर्जी. 

अभिषेकला 'धर्मा'च्या सिनेमातून काढण्यात आलेलं

करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. या प्रॉडक्शनचा २०१२ साली आलेला 'अग्निपथ' सिनेमा चांगलाच गाजला. हृतिक रोशन-संजय दत्त या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, "मी अग्निपथसाठी कास्टिंग डायरेक्टरचं काम करत होतो. सिनेमातील भूमिकेच्या निवडीसाठी मी काही अभिनेत्यांचा विचार केला. परंतु मी निवडलेले अभिनेते त्या लोकांना चुकीचे वाटले."

अभिषेकला 'अग्निपथ'मधून काढण्यात आलं

अभिषेकने 'अग्निपथ'साठी आणलेले अभिनेते खूपच अनुराग कश्यप स्टाईल होते. अनुराग कश्यपच्या सिनेमात जसे अभिनेते असतात तसे हे अभिनेते होते. अभिषेकचं काम पसंत न पडल्याने करणने त्याला 'अग्निपथ' सिनेमाच्या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला. आता हा करण नेमका कोण? तो करण जोहर आहे का? हे मात्र अभिषेकने निश्चित सांगितलं नाही. आज हाच अभिषेक जनाच्या भूमिकेत 'स्त्री २' गाजवतोय. 

टॅग्स :करण जोहरबॉलिवूड