Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग...",'धुरंधर २'पाहून राजामौली काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:04 IST

'धुरंधर २' राजामौलींना कसा वाटला? पोस्ट शेअर करत म्हणाले...

S.S.Rajamauli Reaction On Dhurandhar: बॉलिवूडचा 'एनर्जी किंग' रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित चित्रपट ' धुरंधर २ : द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. गुरुवारी १९ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.पहिल्याच दिवशी १०० कोटी कमाई करत या सिनेमाने रेकॉर्ड केला आहे. २०२६ मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा हा सिनेमा ठरला आहे. सध्या प्रत्येकाच्या तोंडी या चित्रपटाचं नाव आहे. प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळी देखील या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. अशातच प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी 'धुरंधर २' बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २१८.२४ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, कामाचा दिवस म्हणजेच Weekday असूनही प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळतेय. दरम्यान, दाक्षिणेकडील नामांकित दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी देखील धुरंधर पाहून आदित्य धरवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 

राजामौली यांना धुरंधर-२ कसा वाटला?

आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर राजामौली यांनी पोस्ट शेअर करत म्हटलंय,"मला धुरंधरचा पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग  लिखाण, कास्टिंग तसेच तांत्रिक गोष्टी आणि दिग्दर्शनात अधिक सरस ठरला आहे. त्यातील भावनिक बाजू देखील त्याला वास्तवाशी जोडून ठेवते.चित्रपटाचं लिखाण आणि त्यात येणारे ट्विस्ट प्रेक्षकांची चिंता वाढतात.आदित्य धर तू खूप छान काम केलं आहे. चार तासांचा चित्रपट बनवण्यासाठी देखील तितकंच धाडस लागतं."

त्यानंतर पुढे रणवीरचं कौतुक करत ते म्हणाले,"रणवीर, तू काय अभिनय केला आहेस. शेडमधला बहिणीसोबतचा तो प्रसंग म्हणजे अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.त्या सुरुवातीपासून ते क्लायमॅक्सपर्यंत, तू हमजा आणि जस्कीरत या दोन्ही भूमिकांना न्याय दिला आहेस. त्याचबरोबर चित्रपटार आर.माधवनचं काम पाहूनही ते व्यक्त झाले. त्याचं कौतुक करत म्हणाले,देशाविषयी असलेली तुझ्या मनात असलेला चिंता इतक्या उत्तम पद्धतीने पडद्यावर साकरुन दाखवली आहेस की हा तुझा विजय , आम्हाला आमचा विजय असल्यासारखा वाटला. या यशाबद्दल संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन." अशा भावना त्यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajamouli impressed with 'Dhurandhar 2,' praises Ranveer Singh's acting.

Web Summary : Rajamouli lauded 'Dhurandhar 2,' exceeding the first part. He praised the writing, direction, and Ranveer Singh's performance, especially his emotional scenes. The film has grossed ₹218.24 crore in two days.
टॅग्स :रणवीर सिंगधुरंधर सिनेमाबॉलिवूडसिनेमा