Join us

'पुष्पा २' फेम श्रीलीलाला लागली आणखी एक लॉटरी! कार्तिकनंतर 'या' हॅण्डसम हंकसोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:07 IST

साउथ क्वीन श्रीलीलाच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट; 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर 

Sreeleela New Movie: 'पुष्पा-२' या चित्रपटातील आयटम साँगमधून भाव खाऊन गेलीली साउथ अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) सध्या प्रचंड चर्चेत आहे. .त्या चित्रपटातील एका गाण्यामुळे तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. लवकरच ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. बॉलिवूडचा हॅंडसम हंक कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan)श्रीलीला स्क्रीन शेअर करण्यार आहे. दरम्यान,या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच श्रीलीला आणखी एका बिग बजेट प्रोजेक्टची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

 मीडिया रिपोर्टनुसार, डान्सिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीलीला दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.अलिकडेच, श्रीलीला निर्माते महावीर जैन यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं, त्यानंतर ती राज शांडिल्य यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरु लागल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चित्रपटात श्रीलीला बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. शिवाय चाहते या सिद्धार्थ आणि श्रीलीला या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

श्रीलीलाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच अनुराग बसू दिग्दर्शित सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. सध्या अभिनेत्री या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसिद्धार्थ मल्होत्रासिनेमा