Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानला डेट करतेय भारतीय अभिनेत्री ? दोघांचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:19 IST

फिरोज खान हा भारतात चांगलाच चर्चेत आला आहे.

फिरोज खान हा पाकिस्तानाचा प्रसिद्ध अभिनेता आहे. पाकिस्तानी सिनेमांत त्याने काम केलंय. फक्त पाकिस्तानात नाही तर भारतातही त्याचे चाहते आहेत. अनेक भारतीय तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सध्या तो फिरोज खान भारतात चांगलाच चर्चेत आला आहे. भारताली फेमस अभिनेत्री आणि फिरोज खानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या डेटींगची अटकळ बांधली जात आहे. दोघेही डेट करत आहेत का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. 

फिरोज खानला भारतीय अभिनेत्री गितीका तिवारी ही डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. गितीकाने फिरोजसोबतचे काही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. गितीका आणि फिरोज एका सिनेमात एकत्र काम करत असल्याची माहिती आहे. त्यांनी शेअर केलेले फोटो हे फिल्म सेटवरील असल्याचं म्हटलं जात आहे.  फिरोज आणि गितीका यांची ही जोडी 'लक लग गये' या फीचर फिल्ममध्ये एकत्र दिसणार आहे.  अद्याप दोघांनीही त्याच्या नात्याविषयी कोणताही उलगडा केलेला नाही आहे.

गीतिका तिवारी ही तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. गीतिकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. तर फिरोज खानबद्दल बोलायचे झाल्यास, तो घटस्फोटीत आहे. 2018 मध्ये फिरोज खानने अलीझेह फातिमा रजासोबत लग्न केलं होतं. . त्यांना दोन मुलं देखील आहेत. फिरोजने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. दोघांचा घटस्फोट झाला असून आता दोघेही वेगळे आयुष्य जगत आहेत.  पत्नीने केलेल्या आरोपांनंतर फिरोज खान चर्चेत आला होता. 

टॅग्स :फिरोज खानपाकिस्तानसेलिब्रिटीभारतबॉलिवूड