अक्षय कुमारच्या एका आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. हा चित्रपट कोणता तर ‘सूर्यवंशी’. होय, रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय. रोहितने आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटात ‘सूर्यवंशी’ची एक झलक दाखवली होती. ही झलक पाहिल्यानंतर ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक पाहण्यास चाहते उत्सूक होते. तर आता ती प्रतीक्षाही संपलीय. होय, रोहित व अक्षयच्या ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक प्रदर्शित झालेय. काही तासांपूर्वी ट्रेड एक्स्पर्ट गिरीश जौहर यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला. साहजिकचं हा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली नसेल तर नवल...
आला रे आला सूर्यवंशी आला...! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 10:40 IST
अक्षय कुमारच्या एका आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. हा चित्रपट कोणता तर ‘सूर्यवंशी’. होय, रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे
आला रे आला सूर्यवंशी आला...! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज!!
ठळक मुद्देपुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे.