Join us

कतरीना कैफला असा काय बोलला रोहित शेट्टी की झाला ट्रोल?  युजर्स म्हणाले, शेम ऑन यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 15:20 IST

तर हा किस्सा आहे, ‘सूर्यवंशी’च्या सेटवरचा....

ठळक मुद्देरोहितने हा किस्सा शेअर केला आणि सोशल मीडियावर ट्रोल झाला.

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफने आपल्या अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. सुरुवातीला हिला हिंदी बोलता येत नाही, अभिनय येत नाही, अशी टीका तिच्यावर झाली. पण एक वेळ अशी आली की, या टीकाकारांची बोलती आपोआप बंद झाली. आज बॉलिवूडचे दिग्गज निर्माते-दिग्दर्शक कतरीनाला आपल्या सिनेमात घेण्यासाठी उत्सुक दिसतात. अशात तुला कोण बघणार आहे? असे कुणी म्हणाले तर कतरीनाच काय, तिचे चाहतेही खपवून घेणार नाहीत. नेमके हेच घडले. होय, रोहित शेट्टीसारखा बडा दिग्दर्शक कतरीनाला ‘तुला कोण बघणार आहे’ असे खोचकपणे म्हणाला आणि ट्रोल झाला.

रोहित शेट्टीने स्वत: एका इव्हेंटमध्ये हा खुलासा केला. तर हा किस्सा आहे, ‘सूर्यवंशी’च्या सेटवरचा. रोहितने सांगितले की, ‘सूर्यवंशी’चा क्लायमॅक्स सीन शूट होत असताना मी आधीच कतरीनाचे  तीन टेक घेतले होते. यानंतरही पुन्हा एक टेक घे, असे कतरीना म्हणाली. मी मात्र तिला नकार दिला. तुला कोण बघणार आहे? असे मी तिला म्हणालो. यामुळे ती नाराज झाली. तू असा कसा काय म्हणू शकतोस, असे तिने मला खडसावले. यावर मी तिला समजावले. तीन हिरो वॉक करत येत आहेत आणि मागे ब्लास्ट होतोय. अशात तुझ्यावर कुणाचेही लक्ष जाणार नाही, असे मी तिला सांगितले. पण ती चांगलीच संतापली होती. पण मी तरीही तोच शॉट ठेवला. प्रोमोमध्ये तो शॉट दिसतोय. कतरीनाच्या पापण्या मिटलेल्या यात दिसत आहेत. पण कोण बघणार आहे?

शेम ऑन यू रोहित...

रोहितने हा किस्सा शेअर केला आणि सोशल मीडियावर ट्रोल झाला. विशेषत: कतरीनाचे चाहते रोहितवर चांगलेच भडकले. तू कतरीनाला असे कसे काय बोलू शकतोस. ती मोठी स्टार आहे. तुला लाज वाटायला हवी, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी दिल्या.कतरीनाच्या चाहत्यांच्या कमेंट्स तुम्ही खाली बघू शकता.

टॅग्स :कतरिना कैफरोहित शेट्टीसूर्यवंशी