Join us

'सूर्यवंशम' फेम सौंदर्याच्या मृत्यू प्रकरणात २२ वर्षांनी नवा ट्विस्ट, अपघात नाही हत्या, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:49 IST

'सूर्यवंशम' फेम सौंदर्याच्या मृत्यू प्रकरणात २२ वर्षांनी एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे.

Soundarya Death Mystery: तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला 'सूर्यवंशम' (Sooryavansham) हा चित्रपट २१ मे १९९९ रोजी प्रदर्शित झाला होता. 'सूर्यवंशम' हा एक कल्ट चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दुहेरी भूमिकेत होते. या सिनेमातील हीरा ठाकूरची सक्सेस स्टोरी चाहत्यांना भावली होती.  खंबरीपणे उभी असलेली त्याची पत्नी राधा अर्थात अभिनेत्री सौंदर्या  (Soundarya) तुम्हाला आठवत असेलच. 'सूर्यवंशम'नंतर तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेली सौंदर्या ही हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करू लागली होती. पण नियतीने नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होतं. वयाच्या ३१ व्या वर्षी तिच निधन झालं होतं. बंगळुरूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान विमान अपघातात १७ एप्रिल २००४ रोजी तिचा मृत्यू झाला होता. पण, आता २२ वर्षांनंतर तिच्या मृत्यूबाबत नवीन खुलासा (Soundarya Death Controversy) झाला आहे. 

सौंदर्याच्या मृत्यूच्या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. तिचा विमान अपघात झाला, तेव्हा ती गर्भवती होती, असा दावा केला जात आहे. सौंदर्याच्या मृत्यूप्रकरणी टॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर सौंदर्याच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. सौंदर्याचा अपघात नसून खून झाला होता, अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे.

सौंदर्या १७ एप्रिल २००४ रोजी करीमनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तेलुगू देसम पक्षाच्या राजकीय प्रचार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. या अपघातात तिच्या भावाचाही मृत्यू झाला होता. अपघातानंतर सौंदर्याचा मृतदेहही सापडला नव्हता. आता तिच्या मृत्यू प्रकरणात २२ वर्षांनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, मोहन बाबूसोबतच्या मालमत्तेच्या वादातून सौंदर्याचा खून झाला होता. मोहन बाबू यांनी भावंडांवर जमीन विकण्यासाठी दबाव आणला होता. तर विमान अपघातानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे त्या जमीनीवर कब्जा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराचे नाव चित्तमुल्ला असे आहे.

एवढेच नाही तर तक्रारदाराने मांचू कुटुंबातील सुरू असलेल्या वादाबद्दलही सांगितलं आहे. तसेच मांचू मनोजला न्याय देण्याची आणि जलपल्ली येथील ६ एकरच्या जागेत बांधलेले अतिथीगृह जप्त करण्याची मागणी केली आहे.  तसेच मोहन बाबूमुळे आपल्या जीवाला धोका असून पोलिस संरक्षणाची मागणी तक्रारदाराने केली आहे. 

सौंदर्याबद्दल थोडसं...

सौंदर्याचं खरं नाव होतं सौम्या सत्यनारायण (K. S. Sowmya Sathyanarayana) असं होतं. ती मूळची कन्नड अभिनेत्री होती. तसंच ती MBBS डॉक्टरही होती. १९९९ मध्ये तिने  'सूर्यवंशम'सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आपल्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये तिने १०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. सौंदर्या अशी अभिनेत्री होती जिने इतक्या कमी कालावधीतही तमिळ, तेलुगू, मल्याळम,कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये काम केलं. २००३ पर्यंत ती यशाच्या शिखरावर पोहोचली होती. असं असताना तिने लहानपणीचा मित्र जीएस रघु सोबत लग्न केलं होतं. मात्र सौंदर्याच्या नशिबात खूपच कमी आयुष्य होतं. वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी तिच्यावर काळाने घाला घातला. 

टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodमृत्यू