Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६१ तासांपासून बंद होतं सोनू सूदचं Whats App, सुरू होताच आले ९ हजार मेसेज, अभिनेता म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 15:10 IST

गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदचं व्हॉटस अॅप बंद पडलं होतं. अखेर ६१ तासांनी सोनू सूदचं व्हॉट्स अॅप सुरू झालं आहे. 

सोनू सूद हा लोकप्रिय अभिनेता आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांचा खलनायक असलेला सोनू गरीबांचा मसिहा आहे. करोना काळात कामगारांना केलेल्या मदतीमुळे  तो चर्चेत आला होता. त्यानंतरही त्याने मदतीचा ओघ सुरूच ठेवला. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सोनू सूद नेहमी धावून जात असतो. अभिनयापेक्षा तो त्याच्या समाजकार्यामुळेच चर्चेत असतो. पण, सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदचं व्हॉटस अॅप बंद पडलं होतं. याबाबत सोनूने X वरुन ट्वीट करत माहिती दिली होती. २६ एप्रिलपासून सोनू सूदचं व्हॉटस अप चालत नव्हतं. "माझा नंबर व्हॉट्स अॅपवर सुरू होत नाहीये. अनेकदा हा प्रॉब्लेम मला आला आहे. तुमची सर्व्हिस अपग्रेड करून घ्या", असं म्हणत त्याने ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्याने व्हॉटस अॅपच्या अधिकृत हँडलला टॅगही केलं होतं. अखेर ६१ तासांनी सोनू सूदचं व्हॉट्स अॅप सुरू झालं आहे. 

सोनू सूदने ट्वीट करत व्हॉट्स अॅप सुरू झाल्याची माहिती दिली आहे. "अखेर माझं व्हॉट्स अॅप सुरू झालं" असं म्हणत त्याने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. व्हॉटस अॅप सुरू होताच सोनू सूदला तब्बल ९ हजारांहून अधिक मेसेज आले आहेत. "६१ तासांत ९४८३ मेसेज आले आहेत, थँक्स", असं पुढे त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, सोनू सूद लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फतेह' या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. सायबर क्राइमवर हा सिनेमा असून या सिनेमात जॅकलिन फर्णांडिस आणि विजय राज मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :सोनू सूदव्हॉट्सअ‍ॅपसेलिब्रिटी