Join us

सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? अभिनेत्रीनं झहीरच्या कुटुंबासह घालवला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 09:45 IST

सोनाक्षी सिन्हा ही सासरच्या लोकांसोबत खास वेळ घालवताना दिसून आली.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल  (Zaheer Iqbal) सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 जून रोजी दोघांचं लग्न होणार आहे. 19 जून पासून लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. सोनाक्षीनं लग्नाच्या एक आठवडा झहीरच्या कुटुंबासह वेळ घालवल्याचं दिसून आलं. याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांची खास झलक पाहायला मिळत आहे.

लग्नाआधीच सोनाक्षी आपल्या सासरी पोहचलीये. सासरच्या लोकांसोबत खास वेळ घालवताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे.  झहीरची बहीण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट सनम रतन्सीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सोनाक्षी ही तिच्या होणाऱ्या सासऱ्यांबरोबर दिसत आहे. तर या फोटोत  झहीर हा त्याची आई आणि बहिणीच्यामध्ये उभा असल्याचं दिसून येत आहे. सनमने हार्ट इमोजीसह शेअर केलेला हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.

सोनाक्षी व झहीर दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सोनाक्षी आणि झहीर दोघांनी कधीच आपलं रिलेशनशिप लपवलं नाही. दोघंही हातात हात घालून फिरताना दिसले आहेत. सोनाक्षी दुसऱ्या धर्मात लग्न करणार आहे. त्यामुळे अभिनेत्री निकाह करणार की सप्तपदी घेणार? हा प्रश्न चाहत्यांचा मनात एक  निर्माण होत आहे. सोनाक्षी सिन्हाची 'मॅगझीन थीम' लग्नपत्रिका समोर आली होती. यामधूनही लग्न कोणत्या पद्धतीने होणार, हे स्पष्ट झालं नाही. 

सोनाक्षी - झहीर रजिस्टर मॅरेज झालं आहे किंवा 23 जून रोजी सकाळी करू शकतात. सोनाक्षी हिचं लग्न मोठ्या थाटमाटत होणार नसून अगदी साध्यापद्धतीने होणार आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त 'हीरामंडी'च्या सर्व कलाकारांना लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. यानंतर ते रिसेप्शन पार्टी देणार आहेत. पण यावर सोनाक्षी - झहीर यांनी अधिकृत वक्तव्य केलं नाही. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रिटीबॉलिवूडलग्न