Join us

सोनाक्षीच्या आई अन् सासूला झालीये नातवंडांची घाई, अभिनेत्री जहीरला टॅग करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:53 IST

जहीर आणि सोनाक्षी सध्या जगभरात फिरण्याचा आनंद लुटत आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत रजिस्टर मॅरेज केलं. सोनाक्षीने आंतरधर्मीय विवाह केल्याने खूप टीका झाली होती. अजूनही तिच्या लग्नावरुन चर्चा सुरु असते. तर दुसरीकडे जहीर आणि सोनाक्षी जगभरात फिरण्याचा आनंद लुटत आहेत. कधी अमेरिका तर कधी इटलीमध्ये ते प्रवास करत आहेत. दरम्यान सोनाक्षीने नुकतंच सोशल मीडियावर एक मीम शेअर करत तिच्या आई आणि सासूला नातवंडांची घाई झाल्याचं सांगितलं आहे.

लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीर जिकडे तिकडे केवळ फिरतच असल्याने सोनाक्षीची आई आणि सासूला वेगळीच काळजी वाटत आहे. सोनाक्षीने इ्न्स्टाग्रामवर मजेशीर रील शेअर केलं आहे. यामध्ये फ्लाईटमधला एक फोटो आहे आणि हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फी दिसत आहे. यासोबत सोनाक्षीने जहीरला टॅग करत लिहिले, "माझी आई आणि सासू  हा विचार करत आहेत की हे दोघं आपल्याला नातवंडं देण्याऐवजी फक्त फिरतच आहेत."

दरम्यान लग्नानंतर काही दिवसातच सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र तिने कायमच याचं खंडन केलं. सोनाक्षीच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ लव-कुश नाराज होते. त्यांनी आजही जहीरचा स्वीकार केलेला नाही. तसंच घराचं नाव रामायण तरी सोनाक्षीने आंतरधर्मीय विवाह केला यावर अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.

सोनाक्षीने यावर्षी २३ जुन रोजी जहीरसोबत रजिस्टर मॅरेज केलं. त्याआधी बरीच वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. सध्या ते जगभरात फिरण्याचा आनंद लुटत आहेत.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाजहीर इक्बालबॉलिवूडलग्न