मराठी आणि हिंदी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी, संगीतकार श्रेयस पुराणिक आणि गायिका ऐश्वर्या भंडारी यांच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. श्रेयस आणि ऐश्वर्याला मुलगी झाली असून, सोमवारी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
श्रेयसने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, "आमच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. २३ मार्च २०२६ रोजी आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले असून. गणपती बाप्पा मोरया, जय माती दी" या पोस्टसोबतच त्याने एका सुंदर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या लेकीच्या आगमनाची घोषणा केली.
श्रेयस आणि ऐश्वर्याने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. श्रेयस पुराणिकने 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसारख्या मोठ्या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. तर ऐश्वर्या भंडारी ही एक उत्तम गायिका असून तिने अनेक बॉलिवूड गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
या आनंदाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडमधील अनेक गायक आणि संगीतकारांनी, विशेषतः श्रेया घोषाल, अरमान मलिक आणि विशाल ददलानी यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीही या चिमुकल्या परीचे स्वागत करत कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. एकूणच मुलगी झाल्याने श्रेयस आणि ऐश्वर्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Web Summary : Musician Shreyas Puranik and singer Aishwarya Bhandari are parents to a baby girl. The couple shared the news on social media, expressing their joy. They married in 2021. Celebrities and fans have showered the couple with congratulations.
Web Summary : संगीतकार श्रेयस पुराणिक और गायिका ऐश्वर्या भंडारी एक बेटी के माता-पिता बने। दंपति ने सोशल मीडिया पर अपनी खुशी व्यक्त करते हुए यह खबर साझा की। उन्होंने 2021 में शादी की थी। हस्तियों और प्रशंसकों ने दंपति को बधाई दी है।