Madhubanti Bagchi On Dhurandhar Song: अभिनेता रणवीर सिंहचा बहुचर्चित धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र,अजूनही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. सिनेमाचं कथानक, कलाकारांचा अभिनय आणि गाणी या सगळ्याचं भरभरून कौतुक झालं.दरम्यान, चित्रपटाच्या संगीताबद्दल देखील बरीच चर्चा झाली. धुरंधरमधील धुरंधर मधील रंभा हो, तेनू शरारत सिखावां ही गाणी देखील चांगलीच लोकप्रिय ठरली. या गाण्यांना लोकप्रिय गायिका मधुबंती बागचीने आपला आवाज दिला आहे. मात्र, ही गाणी गाण्यापूर्वी मधुबंती थोडी घाबरली होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायिका मधुबंती बागची हिने धुरंधरमधील तिच्या गाण्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. धुरंधरमधील रंभा हो हे गाणे खूपच आयकॉनिक आहे आणि ते अॅक्शन सीक्वेन्सवर शूट केलं गेलं आहे. अलिकडेच, गाण्याची गायिका मधुबंती बागचीने 'Rohini Fever HM' या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "मला आठवतंय की हे गाणं रेकॉर्ड करताना शाश्वतने मला सांगितलं होतं की हे गाणं चित्रपटातील एका अतिशय महत्त्वाच्या सीनवर शूट करण्यात येणार आहे. शाश्वतने मला असंही ही सांगितलं होतं... ज्या भागावर हे गाणे शूट केले जाणार आहे. तो सीक्वेन्स खूपच विचित्र आहे. जेव्हा त्यांनी मला हा सीक्वेन्स दाखवला तेव्हा मी थक्क झाले. ते खरोखरच छान होतं."
त्यानंतर गायिका म्हणाली," हे गाणं जुन्या व्हर्जनने सुरु होतं आणि हळूहळू नवीन व्हर्जनमध्ये गायचं होतं. हे गाणे गाताना मी थोडी घाबरले होते, मला दडपण आलं होतं. कारण ते एक गाजलेलं गाणं असून उषा उत्थुप यांनी ते गायलं आहे.त्यामुळे ती एक जबाबदारी वाटत होती."
दरम्यान, आता धुरंधर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच धुरंधर २, १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला.
Web Summary : Madhubanti Bagchi admitted feeling pressured covering Usha Uthup's iconic 'Rambha Ho' for 'Dhurandhar', fearing comparisons. The song accompanies a unique action sequence. 'Dhurandhar 2' releases March 19.
Web Summary : मधुबंती बागची ने 'धुरंधर' के लिए उषा उथुप के प्रतिष्ठित 'रंभा हो' को कवर करने में दबाव महसूस किया, तुलनाओं का डर था। गाना एक अनोखे एक्शन सीक्वेंस के साथ है। 'धुरंधर 2' 19 मार्च को रिलीज।