Join us

सचेत-परंपरा झाले आईबाबा! गोंडस मुलाला दिला जन्म; व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:49 IST

सोशल मीडियावर या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे.

'शिव तांडव स्तोत्रम' ते 'कबीर सिंह' मधील गाण्यांमुळे लोकप्रिय झालेले गायक कपल सचेत परंपरा (Sachet-Parampara) आई बाबा झाला आहेत. दोघांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गुडन्यूज दिली आहे. परंपराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने चाहत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सचेत परंपरा यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'महादेवाच्या कृपेने आमच्या घरी चिमुकल्या मुलाचं आगमन झालं आहे. हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या आणि या आनंदाच्या प्रसंगी आम्हाला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. नम: पार्वती पतये हर हर महादेव...जय माता दी!"

या व्हिडिओमध्ये बाळाची झलक दाखवली आहे. तिघांच्या हाताचे फोटो शेअर केले आहेत. त्यात मध्ये चिमुकल्या मुलाचा हात आहे. अनेकांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. चाहत्यांनीही पोस्टवर भरभरुन कमेंट केल्या आहेत. 

सचेत परंपरा यांची 'बेखयाली','मलंग सजना','जा रांझन रांझन'.'मैय्या मेनू' यासारखी अनेक गाणी गाजली. 'शिव तांडव स्तोत्र'च्या व्हिडिओनंतर त्यांना लोकप्रियता मिळाली होती. आज ते बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत.

टॅग्स :संगीतबॉलिवूडपरिवारसेलिब्रिटी