Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही निघून जाणार असं का म्हणता?" अरिजीत सिंगने दिलेलं 'हे' उत्तर, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:06 IST

अरिजीत सिंगने निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्याने निघून जाण्याबद्दल वक्तव्य केलं होतं.

भारतीय संगीत क्षेत्रातील जादूचा आवाज आणि लाखो तरुणांच्या हृदयाची धडधड असलेला गायक अरिजित सिंग (Arijit Singh) सध्या एका जुन्या पण धक्कादायक विधानामुळे चर्चेत आला आहे. अरिजितने संगीत क्षेत्रातून निवृत्ती घेण्याबाबत नुकतंच जे विधान केले होते, ते वाचून त्याचे चाहते भावुक झाले असून सोशल मीडियावर यावर मोठी चर्चा रंगली आहे.

नेमकं काय म्हणाला होता अरिजित?एका मुलाखतीत आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना अरिजीत सिंगने अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते की, त्याला या ग्लॅमरच्या जगात कायमचे राहायचे नाही. तो म्हणाला होता, "मी या उद्योगातून लवकरच निवृत्त होईन. मी फार काळ येथे राहणार नाही. मी शांतपणे निघून जाईन आणि कोणाला कळणारही नाही." याच प्रश्नावर एका रिपोर्टरने अरिजीतला विचारलं होतं. ''तुम्ही अनेकदा सांगता मी निघून जाईल. असं का?''. 

यावर अरिजीतने सांगितलं होतं, ''निघून जाणार म्हणजे. कुठे जाणार मी. इथेच तर राहायचं आहे.'' अशा शब्दात अरिजीतने प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच अरिजीतने अचानक प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती का घेतली हे कळू शकलं नाहीये. अरिजीत आता आगामी 'ओ रोमिओ' आणि 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमांसाठी गाणार आहे. त्यानंतर अरिजीतची गाणी सिनेमात ऐकायला मिळणार नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Arijit Singh's retirement plans spark emotional reactions from fans.

Web Summary : Arijit Singh's old statement about retiring from the music industry resurfaced, making fans emotional. When asked why he often talks about leaving, Arijit responded he's not going anywhere. He will sing for 'O Romeo' and 'Battle of Galwan'.
टॅग्स :अरिजीत सिंहबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार