Join us  

'यारियां 2' वर धार्मिक भावना दुखावल्याचा शीख संघटनेचा आरोप, दिग्दर्शकांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:55 AM

शीख संघटना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने 'सौरे घर' गाण्यामधील एका सीनवर आक्षेप घेतला आहे.

येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा यारियां २ हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला. चित्रपटातील 'सौरे घर' गाण्यामधील एका सीनवर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने आक्षेप घेतला आहे.

We raise our strong objection to these visuals filmed, published in 'Saure Ghar' song of 'Yaariyan 2' film directed by Radhika Rao & Vinay Sapru @SapruAndRao, as actor is seen wearing Sikh Kakaar (symbol of Sikh faith) Kirpan in a highly objectionable manner which cannot be… pic.twitter.com/FZXooNMsoH— Shiromani Gurdwara Parbandhak Committee (@SGPCAmritsar) August 28, 2023

दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी सध्या त्यांच्या आगामी 'यारियां २' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.  निर्मात्यांनी नुकतेच 'सौरे घर' हे पहिले गाणे रिलीज केले. मात्र, शीख संघटना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने गाण्यातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला.

 ''अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने शीख काकार (शीख धर्माचे प्रतीक) किरपाण घातलेला दिसत आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. यामुळे जगभरातील शीख समुदायाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या जात आहेत", असे ट्विट शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने केले. शिवाय,सरकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची, युट्यूब आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून गाणे काढून टाकण्याची विनंतीही समितीने केली. 

 

pic.twitter.com/weK4r4T9WH— Radhika & Vinay (@SapruAndRao) August 28, 2023

'यारियां २' या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी यावर निवेदन जारी केले आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी एक ट्वीट करत म्हटले की," गाण्यात अभिनेत्याने किरपाण नाही तर खुकरी घातली आहे.  ते खुकरी आहे, हे चित्रपटातील संवाद देखील हे स्पष्ट करतात. तरीही गैरसमज झाला असेल तर आम्ही दिलगीर आहोत. कोणत्याही धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा किंवा अनादर करण्याचा आमचा हेतू  कधीच नव्हता.

२०१४ साली गाजलेला यारियां या चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. यारियां २ मध्ये एक पूर्णपणे फ्रेश जोडी पाहायला मिळत आहे.  यारिया चित्रपट मैत्री, प्रेम या नात्यावर आधारित आहे. त्यामुळे यारिया २ मध्ये काय नवीन पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :बॉलिवूडदिव्या कुमारसिनेमाशीख