Join us

आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 17:11 IST

आता आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याने या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर रणबीरची एक्स कतरिना कैफ हिनेही अप्रत्यक्षपणे आपली प्रतिक्रिया दिली होती. आता आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याने या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आलिया रणबीर कपूरआधी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याला डेट करत असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. दोघांनी वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये एकत्र बघण्यात आले होते. पण दोघांनी कधीही आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं नव्हतं. 

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्राला जेव्हा आलियाच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, 'आलिया तिच्या आयुष्यात कशाप्रकारचे निर्णय घेत आहे यात त्याला कोणतीही समस्या नाहीये. ती तिच्या आयुष्यात पूर्णपणे पुढे गेली आहे. आता मी तिच्याकडे केवळ एक मित्र म्हणून पाहतो'.  

दरम्यान, आलिया आणि सिद्धार्थ आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या साखरपुड्यावेळी अचानक एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी दोघेही एकमेकांसोबत फारच फॉर्मल वागताना दिसले होते. 

आता आलिया आणि सिद्धार्थ 'स्टुडंट ऑफ द इअर 2' या सिनेमात एका स्पेशल गाण्यात बघायला मिळणार आहेत. तसेच सिद्धार्थ आता कारगिल युद्धातील हिरो विक्रम बत्रा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. तर आलिया 'कलंक' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

टॅग्स :आलिया भटसिद्धार्थ मल्होत्रारणबीर कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड