Join us

श्वेता त्रिपाठीनं चेंबूरमध्ये घेतलं हक्काचं घर, मोजले तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:19 IST

श्वेता त्रिपाठीच्या नव्या घराची किंमत कोटींमध्ये आहे.

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंब, शहर सोडून मुंबईत आलेल्या अनेक कलाकारांना मुंबईनं आपलंसं केलं. त्यानंतर ते कायमचेच मुंबईकर झाले. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने मुंबईत घर घेतलं आहे. मुंबईत घर घेण्याचं तिचं स्वप्न होतं. स्वत:च्या कमाईतून तिनं मुंबईत घर घेतले आहे. तिच्या या घराची किंमत कोटींमध्ये आहे.

'मसान' आणि 'मिर्झापूर'मधून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारी श्वेता त्रिपाठी आता मुंबईकर झाली आहे. तिनं चेंबूर परिसरात ३BHK अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या घराची किंमत तब्बल ३ कोटी रुपये आहे. श्वेताचं हे नवं घर सुप्रीम बुलेवार्ड या सुप्रसिद्ध बिल्डिंगच्या ९व्या मजल्यावर आहे. हे घर ९३८ चौरस फूट इतकं आहे. यासोबतच अभिनेत्रीला २ कार पार्किंग देखील मिळाली आहे. २२ जुलै रोजी या घराची नोंदणी झाली असून, यासाठी श्वेताने १५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं. विशेष म्हणजे, श्वेताने सरकारच्या स्टॅम्प ड्युटी सूट योजनेंतर्गत फायदा घेतला आहे.

श्वेता त्रिपाठीच्या संपत्तीबाबत बोलायचं झालं, तिची एकूण संपत्ती सुमारे ८ कोटी रुपये असल्याचं समजतं. 'मिर्झापूर'च्या प्रत्येक एपिसोडसाठी तिनं २.२० लाख रुपये घेतलेत.श्वेताचं ‘Bunderful’ नावाचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊसही आहे. तसंच, श्वेताला गाड्यांचाही शौक असून तिच्याकडे Mercedes E-Class Exclusive E 220D आहे, ज्याची किंमत ७०.५० लाख रुपये आहे.  तिचा पती चैतन्य शर्मा उर्फ स्लोचीता एक प्रसिद्ध अभिनेता आणि रॅपर आहे. 

टॅग्स :श्वेता त्रिपाठीचेंबूरमुंबईसुंदर गृहनियोजन