Join us
Daily Top 2Weekly Top 5

वो स्त्री है कुछ भी कर सकती है! श्रद्धा कपूरचं ब्रेकअप? राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:18 IST

राहुल मोदीने श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाचं लेखन केलं होतं.

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आगामी 'स्त्री 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. १५ ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय. दुसरीकडे श्रद्धा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती लेखक राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा ती R नावाचं पेंडंट घालूनही दिसली. पण आता नुकतंच श्रद्धाने राहुलला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे.

श्रद्धा कपूरने काही दिवसांपूर्वीच राहुलसोबतचं नातं कबूल केलं होतं. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुलसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, 'दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार'. तिच्या या स्टोरीनंतर श्रद्धाने रिलेशनशिप जाहीर केलं अशीच चर्चा झाली. मात्र आता अचानक तिने राहुलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. त्यालाच नाही तर राहुलची बहीण, त्याचं प्रोडक्शन हाऊस आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या अकाऊंटलाही अनफॉलो केलं आहे. यामुळे श्रद्धा आणि राहुलच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  मात्र राहुल अजूनही तिला फॉलो करतो. 

श्रद्धा आणि राहुलचं खरंच ब्रेकअप झालं आहे का की हा 'स्त्री 2' साठी काही प्रमोशनल स्टंट आहे अशीही चर्चा होत आहे. नेटकरी म्हणाले,  'पाळीव कुत्र्याचं अकाऊंट अनफॉलो करणं हे जरा जास्त झालं','हे फक्त स्त्री 2 च्या प्रमोशनसाठी आहे','वो स्त्री है कुछ भी कर सकती है' अशा कमेंट्स सध्या सोशल मीडियावर येत आहेत. 

राहुल मोदीने श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाचं लेखन केलं होतं. याचवेळी त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. राहुल मोदीने 'प्यार का पंचनामा 2', 'सोनू के टिटू की स्वीटी' सिनेमांचंही लेखन केलं आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूररिलेशनशिपबॉलिवूड