Join us

श्रद्धा कपूरने 'ह्या' शोमध्ये येण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:06 IST

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूरने चक्क या शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला आहे. 

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'ला काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनके कलाकार हजेरी लावत असतात. यावेळी करण त्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारून अनेक गुपित रसिकांसमोर येतात. या शोमध्ये हजेरी लावण्यासाठी सेलिब्रेटीदेखील उत्सुक असतात. मात्र बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूरने चक्क या शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला आहे. 'कॉफी विथ करण'च्या एका भागासाठी श्रद्धाला निमंत्रित करण्यात आले असल्याचे समजते आहे. श्रद्धाला आपल्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांसमोर बोलण्याची इच्छा नसल्याने तिने यासाठी नकार दिल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धा आणि फरहान अख्तर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे, या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याच विषयावर पुन्हा बोलणे टाळण्यासाठी श्रद्धाने या शोमध्ये येण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान श्रद्धाच्या जागी आता या शोमध्ये भूमी पेडणेकरला आमंत्रण दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे.बॉलिवूडची आशिकी गर्ल म्हणजेच श्रद्धा कपूर ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला डेंग्यूमुळे आजारी पडली होती. त्यामुळे तिला सायना नेहवालच्या बायोपिकचे चित्रीकरण थांबवायला लागले होते. आता ती डेंग्यूमधून पूर्ण बरी झाली असून लवकरच ती सायनाच्या बायोपिकच्या शुटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. तिने स्वतः ट्विट करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. श्रद्धाने ट्विटरवर लिहिले की, 'मी बरी झाली आहे आणि पुन्हा शुटिंगवर रुजू झाली आहे. माझा परिवार आणि माझे चाहते हेच माझे बॅक बोन आहेत. त्यांच्याच पाठिंब्याच्या आधारे मी बरी होऊ शकली आहे.' 

टॅग्स :श्रद्धा कपूरकरण जोहरकॉफी विथ करण 6