Join us

सिनेमांमधील होळीचे 4 सीन, बदलली कहाणी; एकातून तर अमिताभ-रेखाचा झाला होता भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:47 IST

Bollywood : सिनेमातील कथांमध्ये तुम्ही इतकी वळणं पाहिली असेल, ज्यात आनंदी जीवनात अचानक मोठा ट्विस्ट येतो आणि कहाणी वेगळ्या वळणावर जाते. यात वेगवेगळे ट्विस्टही असतात. 

Bollywood : होळीचा रंग बॉलिवूडमध्येही दिसू लागला आहे. स्टार होळीच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. सिनेमांबाबत सांगायचं तर अनेक कहाण्यात आहेत. ज्यांवर होळीचा खास प्रभाव बघायला मिळाला. काही कहाण्या तर अशा होत्या की, ज्यानंतर कहाण्यांमध्ये वेगळं वळणं आलं किंवा असं म्हणू शकतो की, होळीच्या मस्तीनंतर सिनेमातील भूमिकांच्या जीवनात बदल झाला. अशाच चार घटनांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सिनेमातील कथांमध्ये तुम्ही इतकी वळणं पाहिली असेल, ज्यात आनंदी जीवनात अचानक मोठा ट्विस्ट येतो आणि कहाणी वेगळ्या वळणावर जाते. यात वेगवेगळे ट्विस्टही असतात. 

मीनाक्षीच्या आयुष्यात आलं वादळ

मीनाक्षी शेषाद्रीच्या आयुष्यात होळीमुळे काय वादळ आलं होतं हे आम्ही आधी सांगतो. राजकुमार संतोषी यांनी 1993 मध्ये सुपरहिट सिनेमा ‘दामिनी’ घेऊन आले होते. या सिनेमात सनी देओल, अमरीश पुरी आणि मीनाक्षी मुख्य भूमिकेत होते. सिनेमाचा टर्निंग पॉइंट होळीच होता. होळीच्या मस्ती दरम्यान तिची अब्रु जाते आणि सिनेमाची कहाणी वळण घेते. या सिनेमाने मीनाक्षी आणि सनीच्या करिअरला हाइप दिली होती.

रडले होते हेमा-अमिताभ

बीआर चोप्रा यांचा 2003 मध्ये ‘बागबां’ सिनेमा आला होता. हा कौटुंबिक सिनेमा लोकांना खूप आवडला होता. सिनेमातील ‘होली खेले रघुबीरा अवध में…’ गाण्याच्या सीननंतर अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी रडले होते. 

होळीनंतर आले होते डाकू

रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ सिनेमाची आठवण येणार नाही असं होऊच शकत नाही. हेमा मालिनी, जया भादुरी, अमिताभ बच्चन, धर्मेन्द्र आणि अमजद खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले होते. सिनेमात ‘होली के दिन दिल मिल…’ गाण्याचं शूट सुरू असताना खरे डाकू तिथे आहे होते.

रेखा-अमिताभचं नातं आलं समोर

1981 मध्य सिलसिला सिनेमा आला होता. या सिनेमाची खूप जास्त चर्चा झाली आजही होते. पण सिनेमातील सगळ्यात खास सीन होता ‘रंग बरसे भीगे चुनरवाली…’ गाणं. या गाण्यात रेखा आणि अमिताभ यांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली होती. दोघांच्या भूतकाळावरून यावेळी पडदा उठला होता. या गाण्यानंतर जयाच्या जीवनात नवीन वळण आलं होतं.

टॅग्स :बॉलिवूडहोळी 2023अमिताभ बच्चनरेखा