Join us

पॉर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्रासाठी शिल्पाचं वैष्णो देवीला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 17:17 IST

Shilpa shetty: नुकतंच शिल्पाने मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर आता तिने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं आहे.

ठळक मुद्देराज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा अस्वस्थ आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दोषी ठरवण्यात आल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शिल्पा या सगळ्या समस्यांना धीराने सामोरं जात असून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या सांभाळत आहे. नुकतंच शिल्पाने मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर आता तिने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा अस्वस्थ आहे. त्यामुळे याच काळात तिने वैष्णो देवीचं दर्शन घेत राजसाठी देवीकडे साकडं घातल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी शिल्पासोबत तिचे काही कुटुंबीयदेखील होते.

हनी सिंगला कोर्टाने बजावली नोटीस; UAE संपत्तीच्या हस्तांतरणावर निर्बंध

दरम्यान, त्रिकुटा पर्वताच्या आसपास धुकं असल्यामुळे हेलिकॉप्टरची सेवा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे शिल्पाला इतर भाविकांप्रमाणे घोड्यावर बसून वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जावं लागलं.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्राबॉलिवूड