Join us

शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला; 'सुखी' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:19 IST

बहुप्रतिक्षित "सुखी" या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा बहुप्रतिक्षित "सुखी" या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अनेक वर्षांनी शिल्पा मोठ्या पडद्यावर येत आहे. तिच्या या चित्रपटाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.  

शिल्पा शेट्टी ‘सुखी’ या चित्रपटात सुखविंदर उर्फ सुखी कालरा या 38 वर्षीय पंजाबी गृहिणीच्या भुमिकेत आहे. सुखी आणि तिच्या मैत्रिणी 20 वर्षांनंतर रियुनियन करण्यासाठी दिल्लीला जातात. महिलांच्या आयुष्यातील नाजूक गोष्टींना स्पर्श करणारा हा सिनेमा आहे. सुखीच्या जगात घेऊन जाणाऱ्या या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. 

2 मिनिटे आणि 17 सेकंदाच्या ट्रेलरनेच चाहत्यांना खूश केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच जबरदस्त डायलॉग आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टीसोबत अमित शाध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला हे कलाकार देखील दिसणार आहेत. हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

नुकतेच 'सुखी' चित्रपटाच्या यशासाठी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा  शिर्डीत पोहचले होते. दोघांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आपला चित्रपट यशस्वी होवा, यासाठी प्रार्थना केली. शिल्पा शेट्टी शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून, ती वर्षातून किमान एकदातरी साईदर्शनासाठी आवर्जून शिर्डीला जाते.

शिल्पा शेट्टी ही फिल्म इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे. जिने स्वतःच्या बळावर यश मिळवलं आहे.  बाजीगर, जानवर, हिंमत, परदेसी बाबू, आग, धडकन अशा चित्रपटांतून शिल्पाने अभिनयाची छाप पाडली. आजही तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहे. शिवाय आपल्या फिटनेसमुळेही ती कायम चर्चेत असते.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडसिनेमा