बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा (ranveer singh) 'धुरंधर: द रिवेंज' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा सिनेमा रिलीज होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. मात्र, पहिल्या दिवसापासून तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा सिनेमा इंडस्ट्रीतील कलाकारांनाही भावत आहे. त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांनी या सिनेमाविषयी त्यांचं मत मांडलं आहे. यामध्येच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धुरंधर आणि रणवीरचं कौतुक केलं आहे.
शिल्पाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'धुरंधर 2' विषयी एक मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने रणवीरचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये तिने रणवीरला 'बब्बर शेर' असंही म्हटलं आहे.
''व्वा..काय परफॉर्मन्स आहे. रणवीर सिंह, तू तर हमजाच्या भूमिकेसाठी जीव ओतून काम केलं आहेस. आणि, ते प्रत्येक फ्रेममध्ये स्पष्टपणे दिसून येतंय. एकदम पॉवरहाऊस. तू बब्बर शेर आहेस'', असं शिल्पाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच तिने अभिनेता आर. माधवन यालाही या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. ''आता कोणतंच आश्चर्य राहिलेलं नाही. तुमच्यातली संवेदनशीलता खरोखरच शिकण्यासारखी गोष्ट आहे.''
शिल्पाने अभिनेता अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी या कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे. या सिनेमात अर्जुनने मेजर इक्बाल ही भूमिका साकारली आहे. सोबतच ती दिग्दर्शक आदित्य धर यांचंही कौतुक करायचं विसरली नाही.
दरम्यान, शिल्पापूर्वी अनेक कलाकारांनी धुरंधरचं कौतुक केलं आहे. यात आलिया भट्ट, महेश बाबू, राम चरण, सिद्धार्थ मल्होत्रा, अल्लू अर्जुन, ऋषभ शेट्टी, रवि तेजा, विष्णु मंचू आणि रकुल प्रीत सिंह या कलाकारांनीही धुरंधरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सिनेमाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर २ हजार कोटींची कमाई केली आहे.
Web Summary : Shilpa Shetty lauded Ranveer Singh's powerful performance in 'Dhurandhar 2,' calling him a 'lion.' She praised his dedication to the role of Hamza and commended the entire cast, including R. Madhavan, for their acting.
Web Summary : शिल्पा शेट्टी ने 'धुरंधर 2' में रणवीर सिंह के शानदार अभिनय की सराहना करते हुए उन्हें 'शेर' बताया। उन्होंने हमजा की भूमिका के प्रति उनके समर्पण और आर. माधवन सहित पूरी कास्ट की एक्टिंग की प्रशंसा की।