Join us

शशी कपूर यांच्या करिअरला लागली होती उतरती कळा; पत्नीचे दागीने विकून चालवलं होतं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:14 IST

Shashi kapoor: शशी कपूर यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले होते. मात्र, तरीही एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स येणं बंद झालं होतं.

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे शशी कपूर. उत्तम अभिनयशैली आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर त्यांनी अनेकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. बरीच वर्ष कलाविश्वात सक्रीय असलेल्या या अभिनेत्याचं  ४ डिसेंबर २०१७ रोजी निधन झालं. मात्र, त्यांच्याविषयी अनेक गोष्टी आजही सोशल मीडियावर चर्चिल्या जातात. यात सध्या त्यांच्या स्ट्रगल काळाची चक्चा होत आहे. इंडस्ट्रीमध्ये जवळपास १६० सुपरहिट सिनेमा देऊनही एक काळ असा आला होता ज्यावेळी त्यांना उदरनिर्वाहासाठी चक्क पत्नीचे दागिने गहाण टाकावे लागले होते.

१९६० मध्ये शशी कपूर यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तेव्हापासून त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले. परंतु, त्यांच्या जीवनात एक काळ असा आला होता जेव्हा त्यांनी काम मिळणं बंद झालं होतं. परिणामी, घरखर्च चालवायलाही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांची आवडती स्पोर्ट्स कार विकावी लागली. इतकंच नाही तर त्यांची पत्नी जेनिफर हिलाही तिचे दागिने आणि अन्य काही सामान विकावं लागलं होतं. शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर याने एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या बिकट परिस्थितीविषयी भाष्य केलं होतं.

दरम्यान, ७० च्या काळात पुन्हा एकदा शशी कपूर यांचे चांगले दिवस आले. त्यांच्याकडे पुन्हा एकदा सिनेमांसाठीच्या रांगा लागल्या. शशी कपूर यांचे सिनेमा जितके गाजले तितकेच काही कॉन्ट्रोवर्शिअलसुद्धा ठरले. यात त्यांचा सिद्धार्थ हा सिनेमा चांगलाच वादात अडकला होता. या सिनेमात अनेक आक्षेपार्ह सीन होते. इतकंच नाही तर यात शशी कपूर आणि सिमी ग्रेवाल यांनी काही बोल्ड सीनही दिले होते. हा सिनेमा इंग्लिशमध्ये रिलीज झाला होता.

टॅग्स :शशी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाकुणाल कपूर