Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : कसं काय बरंय ना? शॉर्ट हेअरकटमध्ये दिसली श्रद्धा कपूर, पापाराझींशी मराठीत मारल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 12:36 IST

पिवळा क्रॉप टॉप आणि निळ्या जीन्समध्ये श्रद्धा गाडीतून उतरली.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) नेहमीच तिच्या साधेपणाने सर्वांचं मन जिंकते. श्रद्धा उत्तम मराठीही बोलते. अनेक ठिकाणी तिला आवर्जुन मराठीतच संवाद साधताना बघितलं असेलच. मुंबईच्या उकाड्यात श्रद्धाने केलेला नवीन हेअरकट चाहत्यांना फारच आवडलाय. फ्रेश लुकसह श्रद्धा पापाराझींशी मराठीत बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

श्रद्धा कपूर नुकतीच एके ठिकाणी कामासाठी पोहोचली असता पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. पिवळा क्रॉप टॉप आणि निळ्या जीन्समध्ये श्रद्धा गाडीतून उतरली. यावेळी तिचा हेअरकट पाहून पापाराझीही 'क्यूट दिसत आहात' असं म्हणाले. तर 'गर्मी खूप आहे ना' असं श्रद्धा म्हणाली.

यावेळी श्रद्धाने सर्व फोटोग्राफर्सची आपुलकीने विचारपुस केली. 'कसे आहात तुम्ही सगळे?' 'कसं चाललंय, मस्त ना?' अशा प्रकारे मराठी भाषेत तिने पापाराझींशी संवाद साधला. श्रद्धाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

श्रद्धा नुकतीच 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात दिसली. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे. मात्र श्रद्धाचा हा कूल अंदाज प्रत्येकालाच भावतोय.

टॅग्स :श्रद्धा कपूरसोशल मीडियाफॅशनबॉलिवूड