Join us

Shahrukh khan Makka : शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:00 IST

सर्वांचा लाडका किंग खान कुठेही गेला की चर्चा तर होतेच. नुकतीच शाहरुखने (mecca) मक्का इथल्या मशिदीला भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Shahrukh khan Makka : बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी पठाण या सिनेमातुन चाहत्यांच्या भेटीला येतोय. काही काळापासून शाहरुखचा एकही नवीन चित्रपट आलेला नाही. त्यामुळे आता पठाण साठी चाहते खुपच उत्सुक आहेत. पठाणच्या (Pathan Teaser) टीझरला तर चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. तर सर्वांचा लाडका किंग खान कुठेही गेला की चर्चा तर होतेच. नुकतीच शाहरुखने (mecca) मक्का इथल्या मशिदीला भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दुबई मध्ये शाहरुख खान 'डंकी' या आणखी एका आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. शुटिंग संपल्यानंतर तो उमराह साठी मक्का इथे पोहोचला. काही दिवसांपुर्वीच शाहरुखने मक्का जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो क्षण आला जेव्हा शाहरुख मक्का ला पोहोचला.शाहरुख खान पांढऱ्या कपड्यात दिसत असून त्याने मास्क लावला आहे. आजुबाजुला सुरक्षा सुद्धा दिसत आहे.

शाहरुखने काही दिवसांपुर्वीच ट्विट करत मक्का ला जाऊन उमराह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामध्ये त्याने लहानपणीच्या आठवणीही जाग्या केल्या.

किंग खान उमराह करण्यासाठी मक्का इथे गेला होता. सौदी अरबच्या एका पत्रकाराने ट्वीट केले आहे, शाहरुख खान उमराहसाठी मक्का इथे पोहोचला आहे.

Navya Naveli Nanda : 'खाऊगल्ली ते हेअरकट'..बिग बींच्या नातीचा थाटच वेगळा, नव्याचा साधेपणा चाहत्यांना भावला

शाहरुखच्या 'डंकी' चे शूट पूर्ण झाले आहे. त्याने ट्विट करुन तशी माहिती दिली होती. तसेच टीममधील सदस्यांचे आभार मानले होते. याशिवाय त्याने सौदी अरेबिया च्या संस्कृतीचे आणि फिल्म मंत्रालयाचेही आभार मानले. शाहरुख लवकरच पठाण, डंकी आणि जवान या चित्रपटांतून आपली जादू दाखवणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानसौदी अरेबियापठाण सिनेमाहिंदीसिनेमा