Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या मित्राचा तू क्रश आहेस, आता मी काय करु?' चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 16:49 IST

शाहरुखचं सोशल मीडिया अकाऊंट कायम चाहत्यांनी भरलेलं असतं.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमातून आपली जादू कायम आहे हे दाखवून दिले. शाहरुखच्या आगामी 'डंकी', 'जवान' सिनेमांचीही जोरदार चर्चा आहे. चाहते तर त्याच्या आगामी सिनेमांसाठी भलतेच उत्सुक आहेत. तर दुसरीकडे शाहरुख खान ट्वीटरवरुन चाहत्यांसाठी संवाद साधतो. नुकतंच त्याने 'ASKsrk' मधून चाहत्यांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरं दिली आहेत.

शाहरुखचं सोशल मीडिया अकाऊंट कायम चाहत्यांनी भरलेलं असतं. अनेकदा त्याच्यावर टीकाही होते पण चाहत्यांचा लाडका किंग कायमच किंग ठरतो. नुकतंच त्याने ट्वीटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यात त्याने सर्वच प्रश्नांना भन्नाट उत्तरं दिली. यामध्ये एका चाहत्याने ट्वीट केले, 'माझ्या मित्राचा तू क्रश आहेस, आता मी काय करु?'

या प्रश्नावर शाहरुखने गंमतीशीर उत्तर देत लिहिले, 'तुला काय करायचंय...मला सांग मी काय करु आता?!!'

  शाहरुखने एकंदरच चाहत्यांच्या ट्वीटवर दिलेल्या उत्तरावर त्याचा हजरजबाबीपणा दिसून येतो. त्याने आपल्या कामाने हे सिद्ध केले आहे की तोच बॉलिवूडचा किंग आहे. तसंच त्याचा चाहता वर्गही अगदी प्रामाणिकपणे आपल्या आवडत्या हिरोसाठी काहीही करायला तयार आहेत. 

शाहरुखच्या 'जवान' (Jawaan) सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. यातील त्याच्या लुकने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलंय. 'जवान'चं शूटिंग पूर्ण झालं असून सप्टेंबरमध्ये सिनेमा रिलीज होत आहे. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडट्विटर