Join us

बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 16:35 IST

एकदम स्टायलिश अंदाजात खान कुटुंबाने लावली हजेरी, त्याची झलक पाहण्यासाठी झाली गर्दी

आज मुंबईतमतदानाचा उत्साह दिसून येतोय. शहरातील सहाही मतदारसंघांमध्ये मतदार गर्दी करत आहेत. सकाळी 7 पासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे सामान्यांसोबत सेलिब्रिटीही रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावत आहेत. तसंच इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) सहपरिवारासह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर खान फॅमिलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

शाहरुख खानमुंबईतील बांद्रा येथील रहिवासी आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तो बांद्रा बँडस्टँड येथे 'मन्नत' बंगल्यात राहतो. आज मुंबईकरांसाठी खास दिवस आहे. पुढील पाच वर्षांसाठी चांगला उमेदवार निवडण्याची आज त्यांना संधी आहे. यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर मतदानाला पोहचत आहेत. मतदान हा प्रत्येकाचाच हक्क आहे मग सामान्य असो किंवा सेलिब्रिटी. आपापल्य मतदानकेंद्रात येत प्रत्येकजण मतदान करतो. शाहरुख खानही कुटुंबासह मतदान केंद्रात पोहोचला. ब्लॅक टीशर्ट, जीन्स या लूकमध्ये तो दिसला. तर सोबत पत्नी गौरी खान, लेक सुहाना, आर्यन आणि अबराम ही दोनही मुलं यावेळी दिसली. मतदान केंद्राबाहेर शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी सर्वांचीच गर्दी जमली. 

शाहरुखच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'जवान' सिनेमात त्याचा एक मोनोलॉग आहे. यात शाहरुख मतदान करणं किती महत्वाचं आहे हे सांगताना दिसतोय. प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यातही शाहरुखने तो हक्क बजावला आहे.

टॅग्स :शाहरुख खानगौरी खानसुहाना खानआर्यन खानमतदानलोकसभा निवडणूक २०२४मुंबई