Join us

Shahrukh Khan : 'लगोरी' खेळायच्या आधी शाहरुखच्या चाहत्यांशी गप्पा, पठाणसाठी किती फीस घेतली यावर म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 09:21 IST

शाहरुख बऱ्याचदा ट्विटरवर चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतोय. अनेकदा तो ट्विटरवर #asksrk हे सेशन घेत असतो आणि चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो.

Shahrukh Khan : बॉलिवूड किंग शाहरुख खान सध्या पठाण सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याआधी शाहरुख बऱ्याचदा ट्विटरवर चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतोय. अनेकदा तो ट्विटरवर #asksrk हे सेशन घेत असतो आणि चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. अनेकदा ही प्रश्न उत्तरं मजेशीर असतात तर अनेकदा तो तोडीस तोड उत्तरंही देत असतो. नुकत्याच झालेल्या एका सेशनमध्ये शाहरुखला पठाणसाठी घेतलेल्या मानधनावरुन प्रश्न विचारण्यात आला. 

#asksrk या ट्विटरवरच्या सेशनमध्ये काल शाहरुखने अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. दरम्यान एका युझरने विचारले, 'पठाण साठी किती फीस घेतलीस? युझरच्या या खोडसाळ प्रश्नावर शाहरुखनेही जशास तसे उत्तर दिले. तो म्हणाला, 'का साईन करतोय का मला पुढच्या फिल्मसाठी ?'

शाहरुख खानने हे आस्क एसआरके सेशनला सुरुवात करण्याआधी सांगितले की १० मिनिटे वेळ आहे त्यातच प्रश्न विचारा नंतर मी मुलांसोबत लगोरी खेळायला जाणार आहे. शाहरुखच्या या ट्वीटनंतर चाहत्यांचे धडाधड मेसेज सुरु झाले.

शाहरुखचा 'पठाण' २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. पठाणच्या रिलीजला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ३० मिलियन व्ह्यूज ट्रेलरला मिळाले आहेत. तर पठाण मधील बेशरम रंग हे गाणंही सध्याचं ट्रेंडिंग आणि लोकप्रिय गाणं आहे.

टॅग्स :ट्विटरशाहरुख खानसोशल मीडिया