Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखनंतर सुहाना खानही साकारणार 'स्पाय', बापलेक एकाच सिनेमात दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 14:40 IST

सिनेमाचं प्रि-प्रोडक्शनही सुरु झालं आहे.

सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. ४ दिवसात सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर किंग खानची लाडकी सुहाना खानही (Suhana Khan) नेटफ्लिक्सवरील 'आर्चीज' सिनेमातून डेब्यू करत आहे. 'आर्चीज'आणि 'जवान' दोन्ही चित्रपट एकाट दिवशी रिलीज होत आहेत. दरम्यान शाहरुख सुहाना ही बापलेकीची जोडी आगामी सिनेमातून एकत्र दिसणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, 'कहानी' आणि 'बदला' सारख्या हटके सिनेमांसाठी ओळखले जाणारे सुजॉय घोष शाहरुख आणि सुहानाला एकाच चित्रपटात घेण्याच्या तयारित आहेत. ते सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासाठी तयार आहेत. ही सुद्धा एक स्पाय फिल्म असणार आहे. सिनेमात शाहरुखची छोटी भूमिका नसून एक्सटेंडेड कॅमिओ असेल. अगदी तसाच जसा त्याने 'डियर जिंदगी'मध्ये निभावला होता. तर सुहाना खान सिनेमात एक गुप्तहेराच्या भूमिकेत दिसू शकते. सिनेमाचं प्रि-प्रोडक्शनही सुरु झालं आहे.

सध्या शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये तो ५ वेगवेगळ्या लुक मध्ये दिसतोय. तसंच यामध्ये त्याने बापलेकाची दुहेरी भूमिका साकारली आहे. सिनेमाचं ट्रेलरच धुमाकूळ घालतोय त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांची लाटच उसळणार असल्याचं चित्र दिसतंय. साऊथ दिग्दर्शक अॅटली कुमारने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. साऊथ ब्युटी नयनतारा शाहरुख सोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानसुहाना खानबॉलिवूडसिनेमा