Join us

अबब!! ‘ब्लडी डॅडी’साठी शाहिद कपूरने आकारले ४० कोटी रुपये? दिग्दर्शकांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 18:37 IST

Shahid kapoor:ब्लड डॅडीच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एका रिपोर्टरने शाहिदच्या त्याच्या मानधनाविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तरं दिग्दर्शकांनीच दिलं.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) सध्या त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' (bloody daddy) या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये पहिल्यांदाच शाहिद एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आला. त्यामुळे हा सिनेमा सध्या चर्चेत येत आहे. या सिनेमासाठी शाहिदने तगडं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी शाहिदनेच मौन सोडलं असून त्याने नेमकं किती मानधन घेतलं हे सांगितलं.

ब्लड डॅडीच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एका रिपोर्टरने शाहिदच्या त्याच्या मानधनाविषयी प्रश्न विचारला. या चित्रपटासाठी तू ४० कोटी फी घेतलीस हे खरे आहे का? असा प्रश्न शाहिदला विचारला. त्यावर, चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मजेशीर उत्तर दिलं. तुम्ही कमीच रक्कम सांगितलीत, असं अली अब्बास जफर म्हणाले. परंतु, शाहिदने या प्रश्नाचं उत्तरं देणं शिताफीने टाळलं. त्याने या प्रश्नावर होकारही दिला नाही आणि नकारही. पण, जर एवढी रक्कम देत असाल तर मी कोणत्याही सिनेमात काम करेन, असं तो म्हणाला.

दरम्यान, ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, डायना पेंटी, रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ९ जून रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा