Join us

Gauri Khan: शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत, अजामीनपत्र वॉरंट जारी, समोर आलं असं कारण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 09:04 IST

Gauri Khan: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लखनौमधील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यामध्ये गौरी खानविरोधात अजामिनपात्र कलम ४०९ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील रहिवासी किरीट जयवंत शाह यांनी तुलसियानी कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी, संचालक महेश तुलसियानी आणि ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान हिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदारांचा आरोपी आहे की, त्याने ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खानच्या प्रचारामुळे प्रभावित होऊन सुशांत गोल्फ सिटी परिसरातील तुलसियानी गोल्फ व्ह्यूमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. मात्र तब्बल ८६ लाख रुपये घेतल्यानंतरही तो फ्लॅट अन् कुणाला दिला गेला. किरीट जसवंत शाह यांनी आरोप केला की, गौरी खान यांनी केलेले दावे ऐकून मी ऑगस्ट २०१५ मध्ये सुशांत गोल्फ सिटी स्थित ऑफिसमध्ये पोहोचलो होतो. येथे त्यांनी तुलसियानी कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि डायरेक्टर महेश तुलसियानी यांच्याशी चर्चा करून फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी फ्लॅटची किंमत ८६ लाख रुपये असल्याचे सांगितले. तसेच २०१६ पर्यंत फ्लॅट मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मी ८५.४६ लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले.

मात्र पैसे दिल्यानंतर आतापर्यंत फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तपास केला असता शाह यांनी जो फ्लॅट बूक केला होता तो कुण्या अन्य व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदारांनी गौरी खानसह तीन आरोपींविरोधात तक्रार दिली होती. त्यानंप पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली आहे.  

टॅग्स :गौरी खानशाहरुख खानउत्तर प्रदेश