Join us
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan, Nora Fatehi : WHAT? शाहरूखचा ‘लाडला’ आर्यन खान नोरा फतेहीच्या प्रेमात? कशी सुरू झाली चर्चा...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:57 IST

Aryan Khan, Nora Fatehi : आर्यन खान बॉलिवूडच्या बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल नोरा फतेहीला डेट करत असल्याची चर्चा आहे. या चर्चा कुठून सुरू झाल्या? तर दुबईतून...

सेलिब्रिटी असणं मुळीचं सोपं नाही. अगदी शिंकलं तरी त्याची हेडलाईन होईल, असंच काहीसं यांच्याबद्दल असतं. यांच्या पर्सनल लाईफमधील प्रत्येक गोष्टीवर जगाची नजर असते. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल तर हे सर्रास घडतं. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटी यामुळे वैतागतात, संतापतात. पण त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलचं जगाचं कुतुहल संपता संपत नाही. तूर्तास असंच काही बघायला मिळतंय.

होय, शाहरूख खानचा ‘लाडला’ आर्यन खानच्या (Shah Rukh Khan’s Son Aryan Khan) अफेअरच्या  चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.  आर्यन खान बॉलिवूडच्या बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल नोरा फतेहीला (Nora Fatehi ) डेट करत असल्याची चर्चा आहे. या चर्चा कुठून सुरू झाल्या? तर दुबईतून. होय, दुबईतील काही फोटो व्हायरल झालेत आणि आर्यन व नोराच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या.

सोशल मीडियावर आर्यन व नोराचे फोटो तुफान व्हाररल होत आहेत. दोघंही एकाच ठिकाणी स्पॉट झालेत आणि लोकांनी त्यांचा संबंध जोडला. खरं तर व्हायरल फोटोत नोरा व आर्यन एकत्र नाही, पण लोकांनी काढायचा तो अर्थ काढला. काही आर्यन व नोराला मित्र म्हटलं तर काहींनी याला थेट डेटींगचं नाव दिलं.

आर्यन व नोराचे फोटो सर्वप्रथम Reddit वर शेअर केले गेलेत आणि तिथून आगीसारखे पसरले. सोशल मीडियानुसार, हे फोटो दुबईतील आहेत. येथे आर्यनने न्यू ईअर पार्टी दिली होते. या पार्टीत हार्डी सिंधूसह त्याचे अनेक मित्र दिसत आहेत. याचठिकाणी नोराही दिसली. मग यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणं सुरू केलं.

आता अनन्या पांडेचं काय होणार? अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली. अनेकांनी आर्यन व नोराचा बचावही केला. एकाच ठिकाणी स्पॉट झालेत याचा अर्थ ते दोघं डेट करत आहेत, असा नाही, अशा शब्दांत अनेक युजर्सनी दोघांचा बचाव केला. आता खरं काय ते लवकर कळेलच.

टॅग्स :आर्यन खाननोरा फतेहीशाहरुख खानबॉलिवूड