Join us

'तुमच्या नेतृत्वात पुढे जाऊ...', G20 च्या यशाबद्दल शाहरुख खानने केले PM मोदींचे अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 21:10 IST

राजधानी दिल्लीत आयोजित G20 परिषदेची आज सांगता झाली.

Shah Rukh Khan G20: भारताच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडली. संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या या शिखर परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी सांगता केली. तीन दिवस चाललेल्या या शिखर परिषदेमुळे प्रत्येक देशवासीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. दरम्यान, ही शिखर परिषद यशस्वी झाल्याबद्दल अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) ने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. 

शाहरुखने त्याच्या अधिकृत X हँडलवरुन पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने नरेंद्र मोदींच्या X हँडलवरील व्हिडिओ शेअर करत म्हटले लिहिले, 'भारताच्या अध्यक्षदेखाली यशस्वी झालेल्या G20 शिखर परिषदेसाठी आणि जगभरातील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी राष्ट्रांमध्ये एकता वाढवल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. या शिखर परिषदेमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर आणि अभिमानाची भावना आहे. तुमच्या नेतृत्वाखाली आपण एकजुटीने पुढे जाऊ. एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य....'

शाहरुख खानचा जवान सुपरहिटशाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला, असून, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तामिळ दिग्दर्शक अॅटलीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोणसह इतर अनेक कलाकार आहेत.

टॅग्स :जी-२० शिखर परिषदनरेंद्र मोदीशाहरुख खानदिल्लीबॉलिवूड