Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फायर'मध्ये नंदिता दाससोबत इंटिमेट सीन करताना शबाना आझमींची झालेली अशी अवस्था; म्हणाल्या-

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:18 IST

'फायर'मध्ये नंदिता दाससोबत इंटिमेट सीन करतानाचा शबाना आझमींचा काय अनुभव होता?

'फायर' सिनेमा हा बॉलिवूडमधील वेगळ्या विषयाचा सिनेमा म्हणून ओळखला जातो. या सिनेमातील बोल्ड विषय आणि वेगळ्या कथानकाची आजही तितकीच चर्चा होते. या सिनेमातील विषयामुळे काही लोकांनी सिनेमावर ताशेरेही ओढले. 'फायर' सिनेमात नंदिता दास आणि शबाना आझमी यांच्यामध्ये एक इंटिमेट सीन होता. अनेकांनी सिनेमाचा विषय म्हणून या सीनला समजून घेतलं. तर काहींनी मात्र टीका केली. अखेर शबाना आझमींनी इतक्या वर्षांनंतर हा सीन करतानाचा अनुभव शेअर केला.

इंटिमेट सीनच्या वेळेस शबाना आझमींची काय होती अवस्था?

रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमींनी याविषयी खुलासा केला. त्या म्हणाल्या की, "मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला ती खूप आवडली. कारण अशा विषयांवर भारतात मोकळेपणाने बोललं पाहिजे हे मला चांगलं माहित होतं. कायमच हा मुद्दा दाबून धरला जातो. मी हे करु शकते का यापेक्षा मला हे खरंच करायचं आहे का? हा विचार मला जास्त सतावत होता. त्यामुळे जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा काय होईल, हाच विचार माझ्या मनात येत होता."

सीनच्या रिहर्सल वेळेस काय झालं?

 फायर सिनेमातील इंटिमेट सीनच्या शूटिंगवेळचा अनुभव शबाना आझमींनी सांगितला. त्या म्हणाल्या की, "हे खूप कठीण होतं. मी त्यावेळी नंदिताला ओळखत नव्हते. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दीपाने आम्हाला लव्ह मेकिंगची सीनची रिहर्सल करायला सांगितलं. नंदिता आणि मी दोघींनीही असे सीन यापूर्वी कधी केले नव्हते. त्यामुळे रिहर्सल करताना नंदिता माझ्या ओठांवर तिचं बोट ठेवलं. परंतु हे रोमँटिक वाटत नव्हतं.  तेव्हा दीपा ओरडली की, मी तुला तिचे दात घासायला लावलं नाहीये. आमच्यासाठी हा सीन शूट करणं खूप विचित्र अनुभव होता." या इंटिमेट सीनच्या शूटवेळेस त्या खोलीत कॅमेरामन, दीपा याशिवाय जास्त लोक नव्हते. आमच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार केलं गेलं होतं.

टॅग्स :नंदिता दासशबाना आझमीबॉलिवूड