भारतीय सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी दखल मिळत नाही. मात्र, एक असा चित्रपट आहे, जो रिलीज होऊन तब्बल ७१ वर्षे उलटल्यानंतरही आजही जागतिक स्तरावर चर्चेत आहे. या चित्रपटाने आपल्या यशामुळे देशाचं नाव उज्ज्वल केलं असून आजही तो नंबर-१ भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो.
ज्या चित्रपटाबद्दल येथे बोललं जात आहे, तो म्हणजे 'पाथेर पांचाली'. हा चित्रपट १९५५ साली प्रदर्शित झाला होता. सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अडीच वर्षांहून अधिक काळ लागला. मर्यादित बजेटमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपटातील सुमारे ९० टक्के शूटिंग गावात झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणीही आल्या होत्या. तरीही, 'पाथेर पांचाली'ने इतिहास रचला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाने तब्बल ११ पुरस्कार जिंकत भारतीय सिनेमाचं नाव जगभरात पोहोचवलं. FIPRESCI Indiaच्या सर्वेक्षणानुसार या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट' हा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाला हा विक्रम मोडता आलेला नाही. या चित्रपटामुळे सत्यजित रे यांना जागतिक ओळख मिळाली. पुढे त्यांनी एकूण २९ फीचर फिल्म्स, ५ डॉक्युमेंट्री आणि २ शॉर्ट फिल्म्सचं दिग्दर्शन केलं.
Web Summary : Satyajit Ray's 'Pather Panchali,' released in 1955, remains celebrated globally. Despite production challenges, it won 11 international awards, solidifying its place as India's best film. Ray's masterpiece continues to inspire.
Web Summary : सत्यजित रे की 'पाथेर पांचाली', 1955 में रिलीज़ हुई, आज भी विश्व स्तर पर प्रशंसित है। निर्माण चुनौतियों के बावजूद, इसने 11 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार जीते, जो भारत की सर्वश्रेष्ठ फिल्म के रूप में अपनी जगह मजबूत करती है। रे की उत्कृष्ट कृति प्रेरणा देती है।