Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान, पहिल्यांदाच दिली नात्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:15 IST

सारा अली खानने पदार्पणातच बॉलिवूडला हिट सिनेमा दिला. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच सारा पुढचे सिनमा मिळाला. सारा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी टाऊनमध्ये चर्चेत असते.

ठळक मुद्देसाराने अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केलात्यानंतर ती रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये दिसली होती

सारा अली खानने पदार्पणातच बॉलिवूडला हिट सिनेमा दिला. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच सारा पुढचे सिनमा मिळाला. सारा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी टाऊनमध्ये चर्चेत असते. सध्या सारा तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे.

फिल्मफेअला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्या लव्ह लाईफबाबतचा खुलासा केला. साराला विचारण्यात आले की तू सिंगल आहे कि नाही ?, यावर ती म्हणाली ''होय, मी सिंगल आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये. मी फक्त वीर पहारियाला डेट केले आहे.''  वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. 

 काही दिवसांपूर्वीच साराने करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कार्तिकने ही सारासोबत जाण्यास आवडेल असा उत्तर दिले होते. सारा आणि कार्तिक चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, १९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या  रिमेकमध्ये कार्तिक दिसणार आहे. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन ‘लव आजकल’च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकच्या अपोझिट आम्ही साराचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.

 साराने अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. त्यानंतर ती रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये दिसली होती. या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहे.

टॅग्स :सारा अली खानकेदारनाथसिम्बाकार्तिक आर्यनकॉफी विथ करण 6