Join us

हायो रब्बा! सारा अली खानचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार चर्चेत, फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:22 IST

Sara Ali Khan Hot Look : केस मोकळे आणि डोळ्यांवर स्क्वायर शेप स्टायलिश चष्मा घातला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत की, साराचा इतका बोल्ड अंदाज याआधी कधी बघायला मिळाला नाही.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आतापर्यंतच्या तिच्या सर्वात बोल्ड अंदाजात दिसून आली. साराने तिचे एकदम बोल्ड अंदाजातील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या फोटोंमध्ये सारा अली खानचा अंदाज फारच वेगळा आणि जबरदस्त दिसत आहे. सध्या तिचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

इन्स्टाग्रामवर सारा अली खानने तिचे हे नवीन फोटो शेअर केले आहेत. यात फोटोत साराने क्रीम कलरचे आउटफिट घातले आहेत. तसेच साराने क्रीम कलरच्या सीक्विन बिकीनी टॉपसोबत सेम कलरची ट्रान्सपरन्ट सीक्विन पॅंट घातली आहे. सारा हा लूक कम्प्लिट करण्यासाठी व्हाइट पर्स आणि गोल्ड चेन घातली आहे. सोबतच हातात एक गोल्डन ब्रेसलेटही आहे. 

केस मोकळे आणि डोळ्यांवर स्क्वायर शेप स्टायलिश चष्मा घातला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत की, साराचा इतका बोल्ड अंदाज याआधी कधी बघायला मिळाला नाही. फोटो शेअर करत साराने लिहिलं की, ट्रॅव्हल एकुलती एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही खरेदी करता आणि श्रीमंत होता'. कमेंट बॉक्समध्ये फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. अनेक हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. 

सारा सध्या तिचा वेळ इस्तांबुलमध्ये घालवत आहे. त्यासोबतच ती आयफा अवॉर्डसाठी अबुधाबीलाही गेली होती. साराने नेहमीच मित्रांसोबत किंवा आईसोबत फिरायला जाताना दिसते. ती यावर्षी काश्मीरलाही फिरायला गेली होती. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर सारा अली खान गेल्यावेळी 'अतरंगी रे' सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत धनुष आणि अक्षय कुमार हेही होते. ती लवकरच विक्की कौशलसोबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसोशल मीडिया