Join us

प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकताच पहिल्या बायकोची पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 09:30 IST

प्रतिकनं पुन्हा लग्न केल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

स्मिता पाटील (smita patil) या भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. स्मिता पाटीलचा लेकप्रतीक बब्बर (pratik babbar) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. प्रतीक  व्हॅलेंटाईन डेच्या (valentine day) मुहुर्तावर १४ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्नबंधनात अडकला. त्यानं गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्नगाठ बांधली. प्रतीकने आई स्मिता पाटीलच्या मुंबईतील घरीच लग्नाचं आयोजन केलं होतं. प्रतिकचं हे दुसरं लग्न आहे.  याआधी प्रतीक सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला होता. मात्र ४ वर्षात त्यांचा घटस्फोट झाला होता. आता प्रतिकनं पुन्हा लग्न केल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

प्रतीकच्या लग्नानंतर सान्या सागरनं एक पोस्ट शेअर केली आहे. "काही काळासाठी एकटं राहणं हे धोकादायक आहे. कारण त्याची मग सवय होते. त्यात किती शांतता आहे, हे तुम्हाला एकदा कळालं की मग तुम्हाला लोकांशी डील करावं वाटत नाही" असं सान्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सान्या सागरने केलेली ही पोस्ट चर्चेत आहे. 

सान्या व प्रतीक यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. पण, चार वर्षांनी २०२३ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली. २०२३ मध्ये त्यानं प्रिया बॅनर्जीला प्रपोज केलं होतं. त्यांनी काही महिन्यांपूर्वी साखरपुडाही केला होता. प्रिया बॅनर्जी ही कॅनेडियन अभिनेत्री आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने काही वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. प्रतीक आणि प्रियाच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. प्रतीकने लग्नात बब्बर कुटुंबाला बोलावलं नाही, त्यामुळेही बरीच चर्चा होत आहे.

टॅग्स :प्रतीक बब्बरस्मिता पाटीलबॉलिवूडलग्न