Join us

"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:00 IST

विकी कौशल बाबा झाल्यावर संतोष जुवेकरने केली कमेंट

अभिनेत्री कतरिना कैफने काल ७ नोव्हेंबर रोजी सकाळी मुलाला जन्म दिला. कौशल कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. कतरिना आणि विकीवर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही अभिनंदनाचा वर्षाव  केला. विकी कौशलचा 'छावा' सिनेमा तुफान गाजला. या सिनेमा मराठी अभिनेता संतोष जुवेकरनेही भूमिका साकारली होती. विकी कौशलच्या पोस्टवर आता संतोषच्या कमेंटनेही लक्ष वेधलं आहे.

संतोष जुवेकर 'छावा' सिनेमामुळे मधल्या काळात खूप चर्चेत होता काही कारणाने त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. संतोष आणि विकी सिनेमाच्या सेटवर एकमेकांचे छान मित्र झाले होते. संतोषने सेटवरील विकीसोबतचे फोटोही शेअर केले होते. आता विकी बाबा झाल्याचा संतोषलाही आनंद झाला आहे. विकी कौशल आणि कतरिनाच्या पोस्टवर संतोषने कमेंट करत लिहिले, "ओय होय...छोटा छावा आ गया..कौशल कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा."

कतरिना कैफने काल सकाळी ८ च्या सुमारास बाळाला जन्म दिला. मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं. बाळाच्या जन्मानंतर विकी आणि कतरिनाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर गुडन्यूज शेअर करण्यात आली. तर आता एच एन रिलायन्स रुग्णालयाने अपडेट दिलं आहे. त्यांनी लिहिले, "कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना मुलगा झाला आहे. आज सकाळी ८ वाजून २३ मिनिटांनी कतरिनाने बाळाला जन्म दिला. कतरिना आणि बाळ दोघांची तब्येत स्थिर आहे. मात्र त्यांनी कधी डिस्चार्ज मिळेल हे अद्याप ठरलेलं नाही."

कतरिना वयाच्या ४२ व्या वर्षी आई झाल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे. याआधी करीना कपूरनेही ४० व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. तर अभिनेत्री नेहा धुपियाने वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. अनेक अभिनेत्रींनी उशिरा प्रेग्नंसीचा पर्याय निवडला. कतरिना कैफच्या प्रेग्नंसीची चर्चा गेल्या दोन वर्षांपासूनच सुरु होती. बऱ्याच काळापासून ती स्क्रीनवरुनही गायब आहे. आता आई झाल्यानंतर कतरिना पुन्हा काम करणार की संसारात व्यग्र होणार असा प्रश्न चाहत्यांनाही पडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Katrina Kaif and Vicky Kaushal welcome baby boy; wishes pour in.

Web Summary : Katrina Kaif and Vicky Kaushal are parents to a baby boy. Celebrities congratulate the couple. Actor Santosh Juvekar, who worked with Vicky in 'Chhava', also wished them. Katrina gave birth at HN Reliance Hospital in Mumbai; both mother and baby are healthy.
टॅग्स :संतोष जुवेकरविकी कौशलकतरिना कैफमराठी अभिनेता