Join us

संजय दत्तने सचिन तेंडुलकरचा 'लिजेंड' असा केला उल्लेख, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:36 IST

संजय दत्तने महान फलंदाज सचिन तेंडुलकरसोबचा फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने कधी रोमँटिक  तर कधी डॅशिंग हिरो वा खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं. चित्रपटांप्रमाणेच खाजगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलं. सोशल मीडियावरही तो सक्रीय असतो. नुकतेच त्याच्या एका पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

संजय दत्तने महान फलंदाज सचिन तेंडुलकरची भेट घेतली आहे. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'प्रिय सचिन, इतक्या दिवसांनी तुला भेटून खूप आनंद झाला. तुझ्या कुटुंबाला भेटूनही छान वाटलं. तू एक  'लिजेंड' व्यक्ती आहेस आणि नेहमीच राहशील'. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून संजय दत्त आणि सचिनच्या चाहत्यांनी पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, काही दिवसांपुर्वी तो तमिळ चित्रपट 'लिओ' मध्ये सुपरस्टार विजयसोबत दिसला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. तर संजय दत्त सध्या त्याच्या आगामी तेलुगु चित्रपट 'डबल आईस्मार्ट' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :संजय दत्तसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमासचिन तेंडुलकर