Join us

लेकाला घट्ट मिठी मारत सानिया मिर्झाने शेअर केला फोटो, भाचीलाही घेतलं जवळ; कॅप्शनने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:37 IST

सानिया मिर्झा झाली भावूक, चाहत्यांचा मिळतोय पाठिंबा

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) तिसरं लग्न केल्यानंतर आता भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची (Sania Mirza) सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. शोएब आणि सानियाला इझहान हा ५ वर्षांचा मुलगा आहे. तो कायम सानियासोबत दिसतो. सानियाने लग्नाच्या १४ वर्षांनंतर शोएबपासून खुला घेतला. आता सानियाने मुलगा इजहान आणि भाची दुआ यांना घट्ट मिठी मारतानाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच तिने दिलेलं कॅप्शन भावूक करणारं आहे.

सानिया आणि शोएब 2010 साली हैदराबाद येथे लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर ८ वर्षांनी सानियाने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव आहे इजहान. ५ वर्षांचा इजहान खूपच गोंडस असल्याचं कायम सानियाच्या फोटोंमधून दिसतं. तो अनेकदा सानियासोबत टेनिस कोर्टवरही जातो. इजहान नेहमी सानियासोबतच राहतो तर अधूनमधून तो वडील शोएब मलिकसोबत दिसतो. सानियाचा मुलामध्ये खूप जीव आहे. म्हणूनच आता शोएब मलिकशी घटस्फोट घेतल्यानंतर सानियाच इझहानचा सांभाळ करत आहे. शिवाय सानियाची बहीण अनम मिर्झा हिला एक मुलगी आहे जिचं नाव दुआ असं आहे. ती सुद्धा सानियाची तितकीच लाडकी आहे. नुकतंच सानियाने इझहान आणि दुआ दोघांना घट्ट मिठी मारतानाचा फोटो शेअर केला. याला तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'लाईफलाईन्स'.

सानियाचा हा फोटो पाहून चाहतेही भावूक झाले आहेत. तिची जवळची मैत्रीण परिणीती चोप्राने फोटो लाईक केला आहे. चाहत्यांनी सानियाला 'खंबीर महिला' म्हणत धीर दिला आहे. सानियाला फक्त भारतातूनच नाही तर पाकिस्तानातूनही पाठिंबा मिळतोय. सगळ्यांनीच शोएब मलिकवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शोएब गेल्या तीन वर्षांपासून सानियाचा विश्वासघात करत होता असाही खुलासा झाला आहे.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकसोशल मीडियापरिवार