Join us

WHAT? सामंथा आणि नागा पुन्हा येणार एकत्र?, अभिनेत्रीने डिलीट केली ती पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:30 IST

तेलुगू इंडस्ट्रीतील पॉवर कपल सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu )आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही महिन्यांपूर्वीच ते घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं होतं.

तेलुगू इंडस्ट्रीतील पॉवर कपल सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu )आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही महिन्यांपूर्वीच ते वेगळे होत असल्याचे सांगितले होते. आता अभिनेत्रीच्या एका इंस्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वास्तविक, समांथाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून घटस्फोटाची पोस्ट काढून टाकली आहे. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू या दोघांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. पण आता ही पोस्ट अभिनेत्रीच्या टाइमलाइनवरुन गायब आहे. मात्र, नागा यांनी ही पोस्ट डिलीट केलेली नाही. 

समंथाच्या प्रोफाईलवरून ती पोस्ट डिलीट केल्यानंतर चाहत्यांचा अंदाज आहे की, दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत का? दोघांमधील भांडण मिटले आहे का? मात्र, यावर समंथा रुथ प्रभू किंवा नागा चैतन्य यांच्याकडून कोणतेही वक्तव्य देण्यात आलेले नाही.

दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी या जोडीने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण देखील आलं होतं. समंथा- नागा चैतन्य यांनी जवळपास ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. परंतु, लग्नाला ४ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodबॉलिवूड