Join us

ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर सलमान खानची आई 'या' अभिनेत्रीची मोठी चाहती, भाईजानचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:36 IST

सलमान खानने बिग बॉसमध्ये एकदा त्याची आई कोणत्या अभिनेत्रीची चाहती आहे, याचा खुलासा केला होता.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सर्वांचा लाडका अभिनेता. सलमान खानने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. 'वॉन्टेड', 'दबंग', 'बजरंगी भाईजान', 'प्रेम रतन धन पायो', 'किसी का भाई किसी की जान' अशा अनेक सिनेमांमधून सलमानने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. सलमानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. ऐश्वर्या रायपासून कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत सलमानने सिनेमात अभिनय केला. पण त्याची आई मात्र एका वेगळ्याच अभिनेत्रीची डाय हार्ड फॅन आहे. कोण आहे ही अभिनेत्री याचा खुलासा सलमानने बिग बॉसच्या घरात केला होता. 

सलमानची आई या अभिनेत्रीची फॅन

सलमान खानने बिग बॉसचं सूत्रसंचालन करुन त्याच्या अनोख्या शैलीत सीझन गाजवले हे आपल्याला माहितच आहे. DNA ने केलेल्या रिपोर्टनुसार बिग बॉसच्या सातव्या पर्वात सलमान खानच्या शोमध्ये एक अभिनेत्री तिच्या मालिकेचं प्रमोशन करायला आली होती. तिचं नाव सनाया इराणी.

सनायाने बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये तिच्या 'रंगरसिया' मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी माझी आई तुझी फॅन आहे, असं सलमान तिला म्हणाला होता. हे ऐकताच सनाया लाजून हसली होती. अशाप्रकारे सलमानची आई सुशीला चरक या सनायाच्या चाहत्या असल्याचा खुलासा भाईजानने केला होता.

 

कोण आहे सनाया इराणी?

सनाया ही बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील मोठी अभिनेत्री आहे. सनायाने काजोल-आमिर खानसोबत 'फना' सिनेमात मेहबूबा ही भूमिका साकारलेली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. याशिवाय शाहरुखसोबत सनाने विविध जाहिरातींमध्ये अभिनय केला. तसंच 'लेफ्ट राईट लेफ्ट', 'कसम से', 'मिलेंगे जब हम तुम' अशा मालिकांमधून अभिनय केला. बरुण सोबतीसोबत 'इस प्यार को क्या नाम दू' ही सनायाची मालिका प्रचंड गाजली.

टॅग्स :सलमान खानसनाया ईरानीबॉलिवूडटेलिव्हिजन