Join us

'हा' चित्रपट फ्लॉप व्हावा अशी होती सलमानची इच्छा; वाचा काय होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 20:11 IST

सलमानने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता.

सलमान खानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही त्यांच नाव इंडस्ट्रीत फक्त एक यशस्वी अभिनेता म्हणून घेतले जाते. सध्या तो 'टायगर 3' या  चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्यामुळेच प्रेक्षक भाईजानच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.  सलमानच्या रंजक गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतील. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमानच्या आयुष्यातील खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सलमानने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.  या चित्रपटात सलमान सहाय्यक भूमिकेत होता.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  आपला पहिला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप व्हावा अशी इच्छा होता. कारण, चित्रपटातील त्याच्या अभिनयाने तो अजिबात समाधानी नव्हता. म्हणूनच चित्रपट चालू नये अशी त्याची इच्छा होती. पण तसे झाले नाही. याच चित्रपटाने सलमानचे करिअर घडवले. या चित्रपटानंतर 1989 मध्ये सलमान 'मैंने प्यार किया'मध्ये मुख्य भूमिकेत दिसला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

सलमानच्या चित्रपटांचा प्रभाव गेल्या काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर दिसत नसला तरी, आतापर्यंत त्याने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा हीट चित्रपट दिले आहेत. 'मैने प्यार किया'पासून 'दबंग', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान' आणि 'टायगर' सारख्या चित्रपटांपर्यंत सलमानने बॉक्स ऑफिसवर राज्य केले आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' या वर्षी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमा