Join us

'बॅटल ऑफ गलवान'साठी सलमानची जोरदार तयारी, लडाखमध्ये भारतीय जवानांसोबत काढले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:18 IST

'बॅटल ऑफ गलवान' सेटवरील व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

'दबंग' अभिनेता सलमान खान(Salman Khan) सध्या 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. सिनेमाचं शूट लेह लडाख येथे सुरु आहे. लडाखच्या मायनस डिग्री तापमानात सिनेमाची टीम शूट करत आहे. सलमान खानचे काही फोटो सेटवरुन व्हायरल झाले होते. त्याने स्वत: एक फोटो शेअर केला होता. तर आता भारतीय सैन्यदलासोबतचा त्याचा एक फोटो समोर आला आहे. तसंच सेटवरील व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमासाठी जोरदार तयारी करत आहे. यासाठी त्याने कमालीचं वजन घटवलं. 'सिकंदर'च्या अपयशानंतर या सिनेमाकडून सलमानला आणि चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमानने या वयात इतकं कठीण शूट करणं सोपं नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. आता त्याचे लडाखमधील फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सलमानने सैन्यासोबत, त्यांच्या कुटुंबासोबतही फोटो काढले आहेत. तसंच सेटवरील शूटच्या तयारीचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

बॅटल ऑफ गलवान' सिनेमाविषयी

'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीनच्या लष्करी संघर्षावर आधारित आहे, जो भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी बनवला जात आहे. या चित्रपटात सलमान खान कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'शूटआउट एट लोखंडवाला' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अपूर्व लाखिया करत आहेत.  चित्रपटात चित्रांगदा सिंह, जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हिरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज यांसारखे कलाकारही दिसणार आहेत. सर्वांना भाईजानच्या या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

टॅग्स :सलमान खानलडाखबॉलिवूडभारतीय जवान