Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान सेटवर वेळेत येत नाही? अभिनेत्री चित्रांगदाने केला खुलासा, म्हणाली- "मी मानसिकरित्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:46 IST

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने सलमानच्या वागण्याबद्दल खास खुलासा केला आहे.

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन सध्या लांबणीवर पडले असून, विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आता हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या चित्रपटात सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने सलमानच्या वागण्याबद्दल खास खुलासा केला आहे.

सलमानसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना चित्रांगदा म्हणाली, "आम्ही हा चित्रपट अतिशय मेहनतीने आणि मनापासून बनवला आहे. लोक सलमानबद्दल अनेक गोष्टी बोलतात, तो असा आहे, तसा आहे. मलाही त्याच्याबद्दल अनेक अफवा ऐकायला मिळाल्या होत्या. जसे की, सलमान वेळेवर आला नाही किंवा शूटिंगचे वेळापत्रक गडबडते, त्यामुळे मला या गोष्टीसाठी तयार राहावे लागेल, असे अनेकांनी सांगितले होते."

चित्रांगदा पुढे म्हणाली, "पण प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही. इतक्या लोकांकडून तो अनप्रोफेशनल असल्याच्या अफवा ऐकल्या होत्या की मी स्वतःला मानसिकरीत्या तयार केले होते. मात्र, त्यात अजिबात तथ्य नाही. तो अत्यंत साध्या स्वभावाचा आणि सर्वांशी मनमोकळेपणाने वागणारा माणूस आहे."

सेटवरील माणुसकी

सलमानच्या स्वभावाचे कौतुक करताना ती म्हणाली, "त्याची एक खास गोष्ट म्हणजे, सेटवर काम करणाऱ्या लहानात लहान माणसाचीही तो काळजी घेतो. मग तो लाईटमन असो किंवा असिस्टंट डायरेक्टर (AD). त्यांनी ब्रेक घेतला का, वेळेवर जेवण केले का, त्याच्याशी सेटवर नीट वागले जात आहे का, याची सलमान स्वतः विचारपूस करतो. इतकी वर्षे या इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही त्याच्या मनात इतरांबद्दल असलेली ही काळजी खरोखरच कौतुकास्पद आहे."

'मातृभूमी'ची नवीन रिलीज डेट

सलमान खानचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' हा चित्रपट आता १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आधी हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी येणार होता, परंतु आता तो स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा यांची जोडी पाहायला मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan punctual? Chitrangada Singh reveals on-set behavior.

Web Summary : Chitrangada Singh refuted rumors about Salman Khan's unprofessionalism on set. She praised his caring nature towards all crew members and confirmed his punctuality. Their film, 'Matrubhoomi,' is expected to release on August 14, 2026.
टॅग्स :सलमान खानचित्रांगदा सिंगबॉलिवूड