अभिनेता सलमान खान (Salman Khan) वयाच्या सोशल मीडियावर फारसा नसतो. तो सतत काही ना काही पोस्ट करताना दिसत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सलमान इन्स्टाग्रामवर रात्रीच्या सुमारास पोस्ट करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने मध्यरात्री आप्लया भावोजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. यातलं त्याचं वाईट इंग्रजी वाचून नेटकऱ्यांनी भाईजानला झोपण्याचा सल्ला दिला होता. तर आता पुन्हा काल रात्री सलमानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पश्चातापाची भाषा केली आहे.
सलमान खानने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिले, "वर्तमान तुमचा भूतकाळ बनतं, भूतकाळ तुमच्या भविष्याला सामोरा जातो. वर्तमान हीच तुमची संधी आहे, जे कराल ते योग्य करा. सतत चुका झाल्या तर ती सवय बनते आणि मग तोच तुमचा स्वभाव होतो. कोणालाही दोष देऊ नका. तुम्हाला जे करायची इच्छा नाही ते कोणीही तुम्हाला करायला लावणारही नाही असं मला माझे बाबा म्हणाले होते. ते अगदी खरं आहे. मी त्यांचं सुरुवातीलाच ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. पण ठिके अजूनही उशीर झालेला नाही."
सलमानने रात्री १२ च्या सुमारास ही पोस्ट केली. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत 'खरं आहे, भाईजान','योग्य शब्द' असं लिहिलं आहे. सलमान खान वयाच्या ५९ व्या वर्षीही आपल्या चार्मिंग लूकने आणि युनिक स्टाईलने चाहत्यांना घायाळ करत आहे.
सलमान खान सध्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाच्या तयारित व्यग्र आहे. यासाठी तो त्याच्या शरीरयष्टीवर मेहनत घेत आहे. दिवसरात्र जिम, बॉक्सिंग करत आहे. सिनेमात तो भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. याचं शूट लडाखमध्ये होणार आहे. लडाखच्या मायनस तापमानात त्याला १५ दिवस शूट करावं लागणार आहे. या वयात आताहे कठीण होत चालल्याचं सलमान खान नुकतंच एका मुलाखतीत म्हणाला.