Join us

काय सांगता?? भाईजानचा लखपती टॉवेल; तब्बल इतक्या रुपयांना झाला लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:25 IST

salman khan: भाईजानच्या 'त्या' टॉवेलसाठी लाखांचा पाऊस

ठळक मुद्देभाईजानने वापरलेल्या टॉवेलचा झाला चक्क इतक्या रुपयांना लिलाव

२००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'मुझसे शादी करोगी' हा चित्रपट आठवतोय का? डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची लोकप्रियता आतादेखील यकिंचितही कमी झालेली नाही. त्यामुळेच या चित्रपटात सलमान खानने वापरलेल्या टॉवेलचा लाखो रुपयांना लिलाव करण्यात आला आहे.

'मुझे शादी करो'गी या चित्रपटातील 'जीने के हैं चार दिन' या गाण्यामध्ये सलमान खानने वापरलेल्या टॉवेलचा काही काळापूर्वीच लिलाव झाला आहे. विशेष म्हणजे हा टॉवेल चक्क १ लाख ४२ हजार रुपयांना विकला गेला आहे.

'मुझे शादी करोगी' या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं असून निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केलं आहे. या चित्रपटात अमरीश पुरी, कादर खान, सतीश कौशिक, राजपाल यादव यासारखे कलाकार झळकले आहेत.

दरम्यान, सध्या सलमान 'टायगर ३' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इमरान हाश्मीदेखील झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडेच या चित्रपटातील सलमानचा पहिला लूक समोर आला असून सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडअक्षय कुमारप्रियंका चोप्रा