Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानने संजय दत्तला गिफ्ट केली होती BMW, संजूने रागात समुद्रातच फेकून दिलेली चावी; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 18:43 IST

सलमान खान आणि संजय दत्तच्या मैत्रीचा किस्सा

मनोरंजनसृष्टीत कोणी कोणाचा मित्र नाही असं म्हणतात. पण बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्यांच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चेत असतात. सर्वांचा आवडता भाईजान म्हणजेच सलमान खानने (Salman Khan) तर अनेक कलाकारांसोबत मैत्री निभावली आहे. त्यातच एक आहे संजय दत्त (Sanjay Dutt). मात्र एकदा सलमान खानने गिफ्ट केलेल्या BMW कारची चावीच संजय दत्तने थेट समुद्रातून फेकून दिली होती. त्याच्या या रागाचं नक्की काय कारण होतं?

त्याचं झालं असं की सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान 'मैने दिल तुझको दिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. या सिनेमात संजय दत्तने छोटी भूमिका साकारली होती. सलमानच्या मैत्रीखातर त्याने यासाठी काहीच मानधनही घेतलं नव्हतं. संजय दत्तनेही स्क्रीन न ऐकताच या भूमिकेसाठी होकार दिला होता. सिनेमा बनल्यानंतर सलमानने घरी पार्टी ठेवली होती. त्याचवेळी त्याने ब्रँड न्यू M5 मागवी होती. ट्रकमधून अनलोड केल्यानंतर त्याने ती आपल्या घरासमोर पार्क केली. नंतर तो संजय दत्तला बाहेर घेऊन गेला आणि हा BMW चा ब्रँड पहिल्यांदाच भारतात आला आहे आणि मी तुला गिफ्ट करत आहे. सलमानचं हे महागडं गिफ्ट पाहून आधी तर संजय दत्तने त्याचे आभार मानले. पण नंतर रागारागात त्याने कारची चावी समुद्रात फेकली.

एका मुलाखतीत सलमान म्हणाला होता की जी गाडी त्याने संजय दत्तला गिफ्ट केली होती त्याच्यासोबत ती एकुलती एकच चावी होती. मात्र ती तर समुद्रात गेली. मग दोन दिवस लोक चावी शोधत होते. अखेर ४ दिवसांनंतर ती सापडली. यानंतर संजय दत्त पुन्हा चिडून म्हणाला की तू गिफ्टच्या रुपात मला सिनेमासाठी पेमेंट करत आहेस? 

हा किस्सा दोघांच्यातली घट्ट मैत्री दर्शवणारा आहे. सलमान आणि संजय दत्तने 'साजन','चल मेरे भाई' यासारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.ओ

टॅग्स :संजय दत्तसलमान खानबॉलिवूडबीएमडब्ल्यू